मुंबई : देशात नागरिकांना कुठे संघर्ष करावा लागले याचा काही नाही. काही वेळेला असा संघर्ष असतो की, नैसर्गिक (Natural) कारणामुळं लोक वंचित राहत आहेत. सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा नदीचा पूल तुटल्यामुळे नदीतून बाईक घेऊन जात आहे. उफनती नदी असल्याची माहिती एक वेबसाईटने दिली आहे. देशात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचे व्हिडीओ (video viral) या आगोदर सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अधिक कमेंट येत आहेत. त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्या मुलाकडे बजाज कंपनीची पल्सर बाईक आहे. त्याचबरोबर त्याने हेल्मेट सुध्दा घातले आहे. हा पूल नदीच्या किनारी होता. परंतु तुटलेला पूल व्हिडीओत दिसत आहे. त्या मुलाला पूला ओलांडून पलिकडे जायचं आहे. मुलाने आपल्या पायातील बूट काढून घेतले, त्यानंतर गाडीचा स्टार्टर मारला.
बघता-बघता तो मुलगा पल्सर गाडी घेऊन नदीत उतरला. त्याचबरोबर पूला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला. ज्यावेळी त्या बाईक पाण्यात उतरवली त्यावेळी अनेकांना तो पाण्यात पडेल असं वाटलं होतं. पण त्या तरुणाने त्याचा स्किलने पाण्यातून उत्तम पद्धतीने बाईक बाहेर काढली.
The perfect example of “Where there is a will there’s a way”
Thoughts about this? Very clever or just very risky? pic.twitter.com/FgYfaFlOtt— MotorOctane (@MotorOctane) April 6, 2023
मीडियामध्ये आलेल्या बातम्यावरुन हा व्हिडीओ आराम राज्यातील आहे. तिथं नदीवर असलेला पूल तुटल्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी अधिक त्रास होत आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. पण हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडिओवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.