मुंबई : वाघाला जंगलाचा राजा म्हणतात, कारण तो शिकार करताना किती तरबेज शिकार करतो हे पाहायला मिळते. वाघ शिकार करताना पुर्णपणे ताकदीने हल्ला करतो. ज्या व्यक्ती किंवा प्राण्यावर हल्ला (Tiger Attack Trending Video) करतो, त्या व्यक्तीला साधी हालचाल सुध्दा करता येत नाही. वाघ कमजोर आणि आजारी हत्ती असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांची तात्काळ शिकार करतो. तुम्ही या आगोदर वाघाने हल्ला केलेले व्हिडीओ पाहिले असतील, परंतु सध्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला आहे. हा व्हिडीओ (Shocking Video) एका मोबाईलमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियाच्या (social media) विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये एक मुलगा हत्तीच्या पाठीवर बसून मोठा गवाताच्या परिसरातून निघाला आहे. ज्यावेळी तो हत्तीवरून निघाला आहे, त्यावेळी त्याच्या दोन्ही हातात निमुळत्या आकाराच्या काठ्या आहेत. त्या तरुणाला आपण महावत सुध्दा म्हणू शकतो. तो हत्तीवरुन निघाला आहे, तो एका पर्यटकाला तो जंगलाचा परिसर दाखवत आहे. अचानक वाघ त्या मुलांच्या आणि हत्तीच्या अंगावर उडी मारतो. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत वाघाने असंख्य हल्ले केले, परंतु अशा पद्धतीने हल्ला केल्याचा व्हिडीओ पहिल्यांदाचं पाहिल्याचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.
Wait for tiger .. ?? pic.twitter.com/Pv5r1HiSVD
— Terrifying Nature (@TerrifyingNatur) May 1, 2023
हा व्हिडीओ खरंच घाबरवणारा आहे, वाघ ज्यावेळी अचानक हल्ला करतो, हत्ती आणि त्या मुलाच्या जवळ येतो. त्यावेळी व्हिडीओ संपला आहे. व्हिडीओ काही सेंकदाचा आहे, परंतु डेंजर असल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या खात्यावरून @TerrifyingNatur हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “वाघाची वाट पहा…” एका अभ्यासानुसार, वाघ 13-15 फूट उंचीपर्यंत उडी मारू शकतो.