मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांची भांडण कशा पद्धतीने होतात, हे आपण अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं आहे. दोन प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पटकन व्हायरल होतात. विशेष म्हणजे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Animal viral video) व्हायरल झाले आहेत. काही वेळेला असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, लोकांना त्यांचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती अनेक सगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गवा (Buffalo) आणि सिंहाच्यामध्ये (Lioness) भांडण सुरु आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एका गव्याला सिंहाने पकडले आहे. त्यावेळी बाजूने एक दुसरा गवा धावत आहे. गवा आपल्या शिंगाने सिंहाला हवेत उचलतो आणि फेकून देतो. त्यावेळी सिंहाला त्याच्यासोबत काय सुरु आहे, हे देखील समजत नाही. गवा सिंहाला इतक्या ताकदीने उचलतो की सिंह दुसऱ्या बाजूला जमिनीवर जोरात पडतो. त्यावेळी दोघांमध्ये सुरु असलेलं भांडणं संपतं नाही. सिंह पुन्हा गव्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी पुन्हा गवा सिंहाला पुन्हा हवेत फेकून देतो.
Woow amazing power! pic.twitter.com/90uAvEwvRi
— The Best (@Figensport) June 2, 2023
हा व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ ट्विटरवरती @Figensport नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 2.4 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, गवा हा प्राणी अधिक ताकदवान आहे.