नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Traffic Jam Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ बेंगलूरुमधील (Bengluru) असल्याचं समजतंय. तिथं त्या परिसरात ट्रॅफिक (Traffic) अधिक असल्याचं त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तिथल्या ट्रॅफिकमुळं लोकं सुध्दा अधिक परेशान आहेत. गाड्यांची इतकी वर्दळ असते, की लोकं सुध्दा परेशान झाली आहेत. सध्या एका बसच्या चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो चालक ट्रॅफिकमध्ये जेवण करीत आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर लोकांना असे व्हिडीओ सुध्दा अधिक आवडतात.
सोशल मीडियावर सध्या व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून बेंगलुरु शहराला ट्रॅफिकचं शहर म्हणून ओळखल जाईल अशी सगळीकडं चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे अशा ट्रॅफिकमुळे लोकं परेशान झाली आहेत. कुठल्याही कामाला जाताना त्यांना उशीर होतं आहे. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कित्येक तास लागत आहेत. त्यामध्ये असलेल्या एका बस चालकाचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक बस चालक ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपलं जेवणं करीत आहे. त्या व्हिडीओवरुन तुम्हाला अंदाज येत असेल की ट्रॅफिकमध्ये लोकांचा कितीवेळ वाया जात आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर वेळेचा चांगला उपयोग झाला पाहिजे असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. व्हिडीओला सोशल मीडियावर आल्यानंतर लगेच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती साईं चंद बय्यवरापु नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत 16 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ 86 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ सिल्क बोर्ड जंक्शन परिसरातील आहे. त्या व्हिडीओ अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.