मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये किती भीषण अपघात (Road Accident) झालंय हे दिसत आहे. वेगाने निघालेली कार ट्रकखाली घुसली आहे. संपूर्ण कारचा चेंदामेंदा झाला आहे. हा अपघात पाहणाऱ्या घाम फुटला आहे. ज्या लोकांनी त्या कारचा दरवाजा घाबरत घाबरत उघडला आहे. ज्यावेळी त्या कारचा चालक (car drivar safe) व्यवस्थित बाहेर येतो. हे पाहून तिथं अपघात पाहणाऱ्या धक्का बसला आहे. त्या व्यक्तीला काहीचं झालेलं नाही. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांनी हे फक्त सीटबेल्ट आणि एअरबॅगमुळे शक्य झालं आहे असं म्हटलं आहे. त्याबरोबर या गोष्टी लोकांनी पाळायला हव्यात असं देखील म्हटलं आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवरती आईपीएस अधिकारी स्वाति लाकरा (@SwatiLakra_IPS) यांनी शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट शेअर करीत असताना कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, सीट बेल्ट आणि एयरबॅगचं का महत्वाची आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या पोस्टला पाच हजार लोकांनी लाईक सुध्दा केले आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओ रिट्वीट सुध्दा केलं आहे.
Importance of seat belt and airbag……. pic.twitter.com/qpRHA1zT37
— Swati Lakra (@SwatiLakra_IPS) May 19, 2023
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक कार ट्रकच्या खाली घुसली आहे. कार वेगाने असल्यामुळे त्या कारचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तिथं असलेल्या लोकांना दरवाजा उघडताना सुध्दा अनेक अडचणी झाल्या आहेत. ज्यावेळी लोकांनी दरवाजा उघडला. त्यावेळी कारचा चालक एकदम व्यवस्थित बाहेर आला आहे. त्याला कसल्याही प्रकारची जखम झालेली नाही. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे ? हे आम्हाला तुम्ही कमेंट करुन सांगा.