Video | पिल्लांना वाचविण्यासाठी अजगराशी लढली मांजर, जीवाची पर्वा न करता अजगराशी सामना

| Updated on: Oct 05, 2023 | 4:58 PM

आई आपल्या पिल्लांसाठी वाटेल ते धाडस करायला तयार असते. याची साक्ष देणारा एका अजगर आणि मांजरीच्या लढाईचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

Video | पिल्लांना वाचविण्यासाठी अजगराशी लढली मांजर, जीवाची पर्वा न करता अजगराशी सामना
CAT
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : मांजरीला वाघाची मावशी उगाच म्हटलं जात नाही, हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मांजरीण तिच्या पिल्लांना वाचविण्यासाठी एका भल्यामोठ्या अजगराशी भिडल्याचे दिसत आहे. आई तिच्या बाळांच्या रक्षणासाठी वाट्टेल तितकी किंमत मोजण्यास तयार असते. माणूस असो की प्राणी आपल्या पिल्लांसाठी प्रचंड साहस करुन जातात याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

जगभरात आढळणाऱ्या सापांच्या अनेक जातीपैकी काही जाती प्रचंड विषारी असतात. माणसेच काय प्राणीही या विषारी सापांच्या वाट्याला शक्यतो जात नाहीत. कारण त्याचं विष एखाद्याला क्षणात संपवू शकतं. परंतू एखादी आई बाळाच्या रक्षणासाठी काय करु शकते याचा दाखला देणारा एका मांजरीचा हैराण करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात एक भलामोठा अजगर मांजरीच्या पिल्लांना गिळायला येत असताना दिसत आहे. आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी ही आई खतरनाक अजराशी भिडताना दिसत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत आपण एका खतरनाक अजगराला आपल्या सावजाला गिळण्यासाठी जाताना पाहू शकतो. मांजरीण या अचानक झालेल्या हल्ल्याला किती कमी मिली सेंकदात प्रत्युत्तर देते हे पाहून ती खरोखरच वाघाची मावशी असल्याचे सिद्ध होते. हा व्हिडीओ पाहून आपल्याला अंगावर काटा येईल. आपल्या जीवाची परवा न करता मांजर पिल्लांना वाचविण्यासाठी अजगरांवर प्रतिहल्ला करताना दिसत आहे. मांजरीच्या प्रतिक्षिप्त क्रियेचा वेग अवघा 20-70 मिली सेंकद आहे. तर अजगराच्या (44-70 मिली सेंकद) प्रतिक्षित्प क्रियेच्या वेगापेक्षा तो जादा आहे. मानवाच्या प्रतिक्रीयेचा सरासरी वेग 250 मिली सेंकद असतो यावरुन मांजरीने किती जलद अजगरांवर प्रतिहल्ला केला असावा हे समजून येते. या द्वंदात कोण जिंकतंय हे स्पष्ट दिसत नाही. पण हे खरेच आहे की आई पुढे जगात कोणी बलवान नाही.