कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. आंध्राच्या अल्लुरीत एक अजब प्रकार घडला आहे. येथे एका कोंबडीबरोबर ‘खेला’ झाला आहे. कोंबडीने मोठ्या काळजीने ज्या अंड्यांना आपले समजून काळजी घेतली. त्यांना आठवडे उबवले त्या अंड्यांतून जेव्हा पिल्ले बाहेर आली ती काही वेगळ्याच रंगाची आणि आकाराची होती. या कोंबडीच्या अंड्यातून चक्क मोर आणि लांडोरीची पिल्ले निघाली आहेत. कोंबडी बिचारी आता या लांडोरीच्या पिल्लांना आपलीच पिल्ले समजून त्यांचे पालनपोषण करीत आहे.
हा अनोखा प्रकार अल्लूरी येथील आदिवासी विभागात घडला आहे.येथील एका आदिवासी रहिवाशाने काही कोंबड्या पाळल्या आहेत. तो तीन आठवड्यांपूर्वी जंगलात गेला होता. तेथे त्याला काही अंडी मिळाली. ती अंडी कोंबडीच्या अंड्यासारखी दिसत होती. म्हणून त्याने ती सांभाळून घरी आणली. त्याने ती अंडी कोंबडीजवळ ठेवून दिली. कोंबडी या अंड्यांना तिचीच अंडी समजली. त्या बिचाऱ्या कोंबडीने इमाने इतबारे या परक्या अंड्यांना उबविण्याचे काम केले. कोंबडी त्या अंड्याची काळजी देखील घेऊ लागली. त्यानंतर अंडी बरोबर फलीत झाल्यानंतर अंड्यातून एक एक करुन कोंबडीच्या पिल्लासारखीच चिव चिव करणारी पिल्ले निघाली. मात्र ही पिल्ले रंगरुपाने थोडी वेगळीच दिसत होती. सुरुवातीला मालकाने याकडे इतके लक्ष दिले नाही. परंतू या पिल्लांना जसजसे पंख येऊ लागले तसतसे या पिल्लांना पाहून ती कोंबडीची नसून मोर-लांडोरीची असल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व पाहून आता परिसरातील सर्वांचा हा विषय चर्चेचा झाला आहे.
इतके दिवस झाले तरी कोंबडी आपली पिल्ले समजून त्यांची काळजी घेत आहे. त्यांना दाणे कीटक कसे टिपावे हे शिकवत आहेत. लाडोंरीचे पिल्ले देखील तिलाच आपली आई समजत तिच्या मागे मागे पुढे फिरत आहेत. दिवस असो कि रात्र ही पिल्ले देखील कोंबडी सोबत राहात आहेत. परंतू ही बातमी पंचक्रोशीत पसरली तशी आता गावातून लोक या पिल्लांना आणि कोंबडीला पाहण्यासाठी येत आहेत.
मला माहिती नव्हते की मोर वा लाडोंरीची अंडी आहेत. मला वाटलं की ही अंडी जंगली कोंबडीची असतील, यासाठी मी ती घरी आणली. सुरुवातीला मी त्यांच्याकडे लक्ष्य नाही दिले. जेव्हा पिल्ले मोठी झाली तेव्हा माझे लक्षात आले की काही तरी वेगळे घडले आहे.