मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे व्हिडीओ (Animal Video) पाहायला लोकांना अधिक आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बिबट्या (leopard) गाईच्या मागे शांत उभा आहे. त्यानंतर काय होतं हे सगळं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ एका गाडीतून मोबाईलमध्ये कैद केला आहे.
नेमकं व्हिडीओत काय आहे
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गाई रस्त्याच्या कडेला गवत खात आहे. गाईच्या मागे बिबट्या दबा धरुन उभा आहे. गाईला मागे बिबट्या उभा असल्याची अजिबात कल्पना नाही. त्याचवेळी तिथून एक गाड़ी निघाली आहे. गाडीचं लक्ष ज्यावेळी बिबट्याकडे जातं. त्यावेळी गाडी थांबवली जातेय.
गाडीच्या लाईटमुळे बिबट्या एकसारखा उभा आहे. काहीवेळाने गाईच्या मागच्या बाजूने बिबट्या पुढच्या बाजूला निघतो. गाईच्या पुढच्याबाजून रस्त्याने पुढे निघतो. त्यावेळी गाडी सुद्धा बिबट्याच्या मागून जात आहे.
तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.त्यावर अनेकांनी कमेंट सुद्धा केली आहे.