मुंबई : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) होण्यासाठी अनेक आयडिया करीत असल्याचं पाहायला मिळतं. हे सगळं पाहत असताना तुम्हाला सुध्दा हसू आवरणार अशी स्थिती आहे. काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळे लोकांचा दिवस (trending video) चांगला जातो. लोकांना खूष करणारे व्हिडीओ ते सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शोधत असतात. सध्या लोकांना आवडेल असा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. एक कुत्रा ढोलाच्या तालावर डान्स करीत आहे. यापुर्वी तुम्ही कधी अशा पद्धतीने कुत्र्याला (Dog Viral Video) नाचताना पाहिलं आहे का ? आजचा दिवस चांगला जाण्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा.
सध्या आपण सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कुत्रा ढोल वाजायला सुरुवात झाल्यानंतर जोरजोरात डान्स करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, जसा ढोल वाजत आहे. त्याचपद्धतीने कुत्रा नाचत आहे. तो पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, ढोल वाजल्यानंतर कुत्रा स्वत: ला कंट्रोल करत नाही. तो कुत्रा डान्स सुध्दा असा करीत आहे की, लग्नात लोकं डान्स करतात तसा. तुम्ही तो व्हिडीओ पाहा म्हणजे तुम्हाला त्या कुत्र्याचं टॅलेंट दिसेलं.
कुत्रा आपले चार पाय हालवून डान्स करीत आहे. त्याचबरोबर आपलं पुर्ण शरीर सुध्दा तो कुत्रा हालवून दाखवत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतंय की, तो कुत्रा प्रचंड टॅलेंटेड आहे. त्याचबरोबर तो कुत्रा अॅक्टिव्ह सुध्दा आहे. काही लोकांनी या व्हिडीओला मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक युझर म्हणतोय, माझ्या मित्रांचं लग्न लखनऊला आहे, दुसरा म्हणतो मला कुत्र्याचा नंबर पाठवा.