Viral Video : रेल्वेच्या रुळात अडकला कुत्र्याचा पाय, समोरून येत होती ट्रेन, मग रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे केले त्याला तोड नाही

| Updated on: Jul 16, 2023 | 12:52 AM

एका मुक्या प्राण्याचा व्हिडीओ कालपासूनचे ट्वीटरवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या वांद्रे परिसरातील असल्याचे म्हटले जात आहे.

Viral Video : रेल्वेच्या रुळात अडकला कुत्र्याचा पाय, समोरून येत होती ट्रेन, मग रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे केले त्याला तोड नाही
dog rescue by rail workers
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : हिंदी चित्रपटात आपण एक खतरनाक सिन पाहिलेला आठवत असेल कि हीरो किंवा हिरोची आई रेल्वे रुळ क्रॉस करतेय तिच्या किंवा त्याच्या मागे व्हीलन लागले आहेत. आणि इतक्यात तिचा पाय रुळांमध्ये अडकतो… एकीकडे व्हीलन दुसरीकडे ट्रेन व्हीलन बनून पाठून येत असते आणि पडद्यावर आता काय होणार ? या कल्पनेने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढलेले… असा सेम सिन मुंबईत प्रत्यक्षात घडलाय..परंतू येथे एक भटका कुत्रा होता, त्याची केविलवाणी अवस्था पाहून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी जे केले त्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर होत आहे.

रेल्वेचे जाळे सर्वदूर विखुरले आहे. मुंबईत तर कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करायचे. आता कोरोनाकाळानंतर या आकड्यात थोडी कमी आली आहे. तर मुंबईच्या व्यस्त रेल्वे नेटवर्कवर दर अडीच मिनिटांना पिकअवरला लोकल सुटत असते. लोहमार्गाच्या जाळे मुंबईत अगदी वस्तीला लागून आहे. एका मुक्या प्राण्याचा व्हिडीओ कालपासूनचे ट्वीटरवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या वांद्रे परिसरातील असल्याचे म्हटले जात आहे.

हा व्हिडीओ पाहा आता

वांद्रे यार्ड परिसरात रेल्वे रुळांच्या क्रॉसओव्हरमध्ये एका भटक्या कुत्र्याचा पाय अडकल्याने तो जोरजोराने केकाटत होता. त्याची ही केविलवाणी अवस्था पाहून अखेर रेल्वेचे कर्मचारी धावून आले, त्यांनी कुदळीने या कुत्र्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. नेमकी त्या रुळावरुन एक गाडी देखील येताना या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर मोठ्या ताकदीने या रेल्वे कर्मचाऱ्याने दोन रुळांच्यामधील गॅप वाढविल्याने या कुत्र्याची सुटका झाली. त्यामुळे तो कूत्रा क्षणाचाही वाट न पाहता तेथून पळून गेला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या मुक्या प्राण्याला केलेल्या मदतीने सर्वच जण हा व्हिडीओ पाहून भारावून जात आहेत.