मुंबई : काही डान्स व्हिडीओ (Dance Video) अधिक चांगले आणि मजेशीर असतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर सु्द्धा अधिक व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल (TRENDING VIDEO) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती अशा पद्धतीचे डान्स करीत असतात की, त्यांच्या आडव्या तिडव्या डान्स स्टेप लोकांना अधिक आवडतात. सध्या इंस्टाग्रामवरती रिनाल्डो सोरेस यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ती व्यक्ती डान्स करीत आहे. ज्यावेळी ती व्यक्ती डान्स करीत आहे. त्याचवेळी तिथं असलेला कुत्रा (Dog Viral video) त्या व्यक्तीच्या पायाला चावत आहे.
व्हिडीओमध्ये रिनाल्डो सोरेस हा एका गल्लीत उभा आहे. तो गल्लीत उभा राहून डान्स करीत आहे. त्या व्हिडिओत तुम्ही पुढे जाऊन पाहिलं तर,त्यामध्ये तुम्हाला एक कुत्रा देखील दिसत आहे. तो कुत्रा त्या व्यक्तीचा पाय चावत आहे. विशेष म्हणजे रिनाल्डो सोरेस कुत्र्याच्या चावण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तर तो स्वत:च्या परफॉर्मेंसकडे अधिक लक्ष देत आहे.
ही पोस्ट मार्च महिन्यात शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल केल्यापासून त्याला लाखो लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हि़डीओ कमेंट सुध्दा अधिक आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘तो कुत्रा काही थांबणारा नाही’ दुसऱ्या एकाने शेअर केलं आहे की, हे खूप अति होत आहे. हा कुत्रा त्या व्यक्तीला अशा पद्धतीने का चावत आहे. या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे.