मुंबई : तुम्ही लहानपणी ज्या बाहुलीने (Dolls) खेळायचा, ती कशी तयार केली जाते याचा तु्म्ही कधी विचार केलाय का ? संपूर्ण बाहुली कशी तयार केली जाते. प्रत्येकवेळी बाजारातून किंवा यात्रेतून अशा गोष्टी तुम्ही खरेदी करायचा. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. तो व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी हा व्हिडीओ (trending video) पाहिल्यानंतर लहानपणाची आठवण झाल्याचं सांगितलं आहे. त्या व्हिडीओला अनेकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या आहेत. तो व्हिडीओ एका फॅक्टरीतला असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती kolkatareviewstar यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, कंपनीत बार्बी बाहुली तयार होत आहे. ज्यावेळी ते मटेरिअल तयार झालं आहे. त्यावेळी त्या बाहुलीचा चेहरा आणि शरीर तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील इतर गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, इकडचं तिकडचं उत्पादन एकत्र कसं केलं जात आहे. शेवटी त्या बाहुलीला पॅक केलं जात आहे.
सहा दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर केली होती. ज्यावेळी ही पोस्ट शेअर केली, तेव्हापासून आतापर्यंत 14 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. विशेष म्हणजे त्या पोस्टला काही लाईक आणि कमेंट सुध्दा आल्या आहेत. काही लोकांनी कमेंट करु सांगितलं आहे, की आम्ही लहानपणी अशा गोष्टींसोबत खेळायचो.
एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, मला ही बाहुली खूप आवडते. दुसरा व्यक्ती म्हणतोय की, मला त्यांच्यासोबत खेळलेलं अजूनही आठवतंय, तिसरी व्यक्ती म्हणते, अशा पद्धतीच्या बाहुल्या त्यावेळी अधिक स्वस्त मिळायच्या. त्या बाहुल्यांचा काळ वेगळा होता, त्यामध्ये आता बराच बदल केला असल्याचं एका नेटकऱ्याने सांगितलं आहे. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, आमच्या आईच्या काळात सुध्दा अशीचं बाहुली पाहायला मिळत होती.