Video : नवीन कार खरेदी केल्यानंतर शोरूममध्ये कुटुंब नाचू लागले, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ

| Updated on: May 23, 2023 | 11:11 AM

व्हायरल झालेल्या व्हिडीओला न्यूज गुरु नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूवी (Mahindra Scorpio-N SUV) खरेदी केल्यानंतर लोकं कशा पद्धतीने डान्स करीत आहेत, हे पाहायला मिळत आहे.

Video : नवीन कार खरेदी केल्यानंतर शोरूममध्ये कुटुंब नाचू लागले, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ
anand mahindra
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Viral Dance Video) काही असे व्हिडीओ असतात, ते तुमच्या चेहऱ्यावर कायम हसू आणतात. सध्या तसाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना सुध्दा आनंद झाला आहे. विशेष म्हणजे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (viral video) एक परिवार कार खरेदी केल्यानंतर डान्स करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमेन आनंद महिंद्रा यांनी सुध्दा आपल्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्यावर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया सुध्दा दिल्या आहेत.

सगळे डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे

व्हायरल झालेला व्हिडीओ न्यूज गुरु नामक पेजकडून ट्विटरवरती शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूवी (Mahindra Scorpio-N SUV) खरेदी केल्यानंतर संपुर्ण परिवार त्याचं सेलिब्रेशन करीत आहे. त्या कुटुंबाला इतका आनंद झाला आहे की, सगळे डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ शेअर करीत आनंद महिंद्रा यांनी सांगितली गोष्ट

व्हिडीओ शेअर करीत असताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन लिहिलं आहे. खरंतर भारतीय ऑटो उद्योगात काम करीत असल्याचा बक्षीस आणि खुशी आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कुटुंबातील भावना समजल्या आहेत आणि प्रतिक्रिया सु्द्धा दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे की, मध्यमवर्गीय लोकांना कार खरेदी करणं आणि घरं खरेदी करणं किती महत्त्वाचं आहे, हे स्पष्ट होतं आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीलं आहे की, ज्यावेळी तुमची स्वप्न पुर्ण होतात. त्यावेळी तुम्हाला डब्बल आनंद होतो. अशावेळी कुटुंबसोबत असणं सुध्दा गरजेचं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत.