चिकन करीसाठी लेकाच्याच जीवावर उठला बाप; दांडक्याने डोकं फोडलं, मग…

| Updated on: Apr 06, 2023 | 12:19 PM

ज्या मुलाचा मृ्त्यू झाला आहे, त्याचं नाव शिवराम असं आहे. घरात बनवलेली चिकन करी खाण्यावरुन शिवराम आणि त्याच्या वडिलाचं भांडण झालं. त्याच्यानंतर संतापलेल्या वडिलांनी त्या मुलाची लाकडी दांडक्याने मारुन...

चिकन करीसाठी लेकाच्याच जीवावर उठला बाप; दांडक्याने डोकं फोडलं, मग...
chicken curry
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मंगळूर : कर्नाटक (karnataka) राज्यात एक भयानक घटना घडली आहे. घरी चिकन (chicken) खायला मिळालं नसल्यामुळे बापाने आपल्या पोटच्या मुलाला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर काही वेळात मुलाचा मृ्त्यू झाला, असल्याचं एका वेबसाईने म्हटलं आहे. त्या मुलाचं वय 32 होतं. पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, त्या मुलाला दांडक्याने मारहाण केली आहे. त्यामुळे त्याचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणाची सगळी माहिती पोलिसांनी (police) बुधवारी झाली केली आहे. मंगळवारी दक्षिण कन्नड़ जिल्ह्यात सुलिया तालुक्यातील गुट्टीगर गावात ही घटना घडली.

ज्या मुलाचा मृ्त्यू झाला आहे, त्याचं नाव शिवराम असं आहे. घरात बनवलेली चिकन करी खाण्यावरुन शिवराम आणि त्याच्या वडिलाचं भांडण झालं. त्याच्यानंतर संतापलेल्या वडिलांनी त्या मुलाची लाकडी दांडक्याने मारुन हत्या केली.

चिकन करी बनवली होती. ज्यावेळी शिवरामचे वडिल घरी आले, त्यावेळी चिकन करी अजिबात शिल्लक नव्हती. त्यामुळे संतापलेल्या वडिलांचे आणि शिवरामचे कडाक्याचे भांडण झाले. दोघांमध्ये भांडण अधिक झाल्यामुळे चिडलेल्या वडिलांनी शिवरामला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरामचे वडील ज्यावेळी घरी परतले, त्यावेळी चिकन करी संपूर्ण संपली होती. त्यामुळे शिवराम आणि त्याच्या वडिलांचं भांडण झालं. त्यानंतर शिवरामच्या वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे शिवरामचा मृत्यू झाला. ह

खून झाल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुब्रह्मण्य पोलिसांनी शिवरामच्या वडीलांना ताब्यात घेतले. शिवरामच्या कुटुंबामध्ये त्याची बायको आणि दोन मुलं आहेत.