मुंबई : जर तुम्ही खाण्याचे अधिक शौकिन आहात ? तर तुम्हाला बिहारच्या डिश (Bihari Dish) लिट्टीबाबत जरुर ऐकलं असेल किंवा माहित असेल. स्वादिष्ट सत्तूने भरलेले लिट्टीचे कुरकुरीत बाहेरील कवच बटाटा किंवा वांग्यासोबत खूप छान लागते. जेव्हा एका महिलेने स्वत: तयार केलेली डिश ट्विटरवरती (Twitter) शेअर केली. तेव्हापासून त्या महिलेची डिश सोशल मीडियावरती (Social media) प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर त्या डिशचा फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंट सुद्धा केली आहे. काही लोकांनी त्या डिशला उल्का असं म्हटलं आहे, तर काही लोकांनी त्याला मंगळाचा तुकडा असं देखील म्हटलं आहे.
शीतल नावाच्या एका महिलेने तिच्या घरी लिट्टी नावाचा एक पदार्थ तयार केला आहे. त्याचबरोबर तो पदार्थ ट्विटरवरती शेअर केला आहे. ज्यावेळी तो पदार्थ भाजला जात होता, त्याचवेळी त्या पदार्थ्याला जाळाने वेडलं आहे. त्यावेळी त्या पदार्थाचा फोटो काढला आहे. फोटो त्या महिलेने त्यानंतर तो पदार्थ किचन टॉवेलवरती ठेवला असल्याचं पाहायला मिळतं आहे. ज्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, त्यांनी पहिल्यांदा आज पहिल्यांदा लिट्टी चोखा तयार करीत असल्याचं म्हटलं आहे.
Making litti chokha for the first time today. ☺️ pic.twitter.com/DTuZeleb9V
— Sheetal ✍ शीतल ✍ شیتل (@ssoniisshh1) March 13, 2023
ही पोस्ट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर त्यावर अनेकांनी कमेंट सुध्दा केली आहे. मजेशीर प्रतिक्रिया वाचण्यासारख्या असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. काही लोकांनी तर लिट्टी या पदार्थाची तुलना सूर्य आणि मंगल ग्रहासोबत केली आहे. एका युजरने लिहिलं आहे, हा लिट्टी चोखा आहे की मंगल ग्रहाचा तुकडा, दुसऱ्याने लिहिलं आहे की, तुम्ही अजून थोडसं झुम करुन पाहिलं असतं, तर तुम्हाला सुर्य दिसला असता.