मुंबई : सोशल मीडियावर (Social media) मुलींचे अधिक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मुली बाईक चालवताना स्टंट करतात, तर काही मुली कार चालवत असताना स्टंट करतात. मुलींच्या चुकीच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो, हे अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं असेल. चुकीच्या पद्धतीचे मुलींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral news) होतात. सध्या एका मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवीन आहे. लोकांनी त्या मुलीला प्रचंड ट्रोल केले आहे. अनेकांनी कमेंटमध्ये ‘पापा की परी का कारनामा’ (Papa Ki Pari Video) असं म्हटलं आहे. हे सगळं पाहून लोकांना प्रचंड राग आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी कार चालवत आहे, त्या मुलीने तिथं असलेल्या पार्किंगमधील बाईकच्या वरती आपली कार चढवली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी ती मुलगी गाडी पार्किंग करीत होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी हा सगळा प्रकार पाहिला. मुलीची चुकी असल्यामुळे सगळे तिच्यावर भडकले होते. चुकी केल्यानंतर सुध्दा मुलीच्या चेहऱ्यावर अजिबात कसल्याही प्रकारचं दु:ख दिसत नाही. विशेष म्हणजे तिने केलेल्या चुकीचं तिला काहीचं वाटतं नाही.
Sirf google map route follow nahi karna hota aage pichhe gaadiyaan bhi dekhni hoti hai #Kanpur pic.twitter.com/Lx4L2OUhdM
— Dilip Rangwani (@ItsRDil) May 10, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कानपूरमधील असल्याची माहिती मिळाली आहे. तिथं एका मुलीने पार्किंग केलेल्या बाईकवरती आपली कार चढवली आहे. ज्या लोकांच्या गाडीचं त्या मुलीने नुकसान केलं आहे. ती लोकं आता नुकसान भरपाई मागत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवरती @ItsRDil नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ आतापर्यंत 97 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून चांगल्या आणि वाईट कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘पापा की परी का कमाल’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीले आहे की, ही मुली हैवी चालक आहे. या व्हिडीओच्याबाबत तुमचं मत काय आहे ? हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा