दिल्ली : दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro Dance Video) काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. काही लोकं त्यामध्ये डान्स करीत आहेत. तर काही लोकं वेगळ्या पद्धतीचे चाळे करीत आहेत. काही असे सुध्दा व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro) व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये लोकांनी चुकीच्या रिअॅक्शन (Trending video) केल्या आहेत. दिल्ली मेट्रो रिल्ससाठी अधिक प्रसिध्द झाली आहे. दिल्ली मेट्रोने जाहीर केलं आहे की, मेट्रोमध्ये रिल्स तयार करणं चुकीचं असल्याचं मेट्रोने जाहीर सुध्दा केलं आहे. सध्या दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी चांगला डान्स करीत आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामध्ये एक मुलगी बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेक लोकं दिसत आहे. ते सुध्दा प्रवास करीत आहेत. अचानक मुलगी डान्स करु लागल्यावर, सगळ्यांचं लक्ष त्या मुलीच्या नाचण्याकडे लागलं आहे. बाजूला उभे असलेले सगळे प्रवासी त्या मुलीचा डान्स पाहत आहेत.
Delhi Metro: Your one stop destination for wholesome entertainment
??????? pic.twitter.com/Yvgt6mnY6s— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) June 9, 2023
मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक काका उभे आहेत. ते आपले स्टेशन येण्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी एक मुलगी अचानक डान्स करायला सुरुवात करते. सगळ्यांच्या नजरा त्या मुलीकडे आहेत. त्यावेळी त्या काकाचं लक्ष त्या मुलीकडे जातं, त्यावेळी ते कावरेबावरे झाले आहेत. त्याचबरोबर ते त्या मुलीकडं एक सारखे पाहत राहिले आहेत. हा व्हिडीओ ट्वि्टरला एका व्यक्तीनं शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कॅप्शन सुध्दा लिहीलं आहे. फुल्लं मनोरंजनासाठी दिल्ली मेट्रोत एक स्टॉप गरजेचा आहे.