मुंबई : काही अपघाताचे भयानक व्हिडीओ (Accident Viral Video) आपण सोशल मीडियावर (Social Media) पाहत असतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना मोठा धक्का लागला आहे. रस्त्यावर अधिक लोकं कशाही पद्धतीने गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी स्कूटीवर बिअर पीत असल्याची दिसत आहे. लक्ष विचलित झाल्यानंतर ती मुलगी एका कारला (bike car accident) जाऊन जोराची धडक देते.
वाहतूक पोलिसांनी दारु पिताना जे आढळले आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. दारु पिणाऱ्या लोकांना वेळीचं अडवल्यानंतर अशा पद्धतीचे अपघात शक्यतो होत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्कूटी चालवत आहे. त्याचबरोबर तिच्या मागे एक व्यक्ती बसलेली असून ती बिअर पीत आहे. त्याचवेळी गाडीचा अपघात झाला आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवरती @uecaiu नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. स्कुटीवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात बिअरचा ग्लास दिसत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या हाताने ती व्हिडीओ तयार करीत आहे. स्कुटी चालवणारी व्यक्ती पाठीमागे पाहून जीभ काढून हसत असल्याची पाहायला मिळत आहे. व्हिडीओ काढत असताना तिचं लक्ष विचलित झालं आहे. त्यामुळे समोर असलेल्या कारचा तिने जोराची धडक दिली.
— pessoas caindo ou quase (@uecaiu) April 8, 2023
ज्यावेळी जोराची कारला मागून धडक बसते. तेव्हा दोन्ही व्यक्ती गाडीवरुन खाली पडल्या आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक फास्ट व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन मिलियन लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओ पाहताना अनेक नेटकरी यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘वाईट कर्माचे वाईट परिणाम’ असे लिहिले. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की निष्काळजीपणा कधीकधी जबरदस्त होतो.