मुंबई : आजकाल अनेक जणांना शरीरावर विविध प्रकारचे टॅटू काढण्याचे नविनच फॅड आले आहे. या टॅटूमुळे आपली ओळख आणखीन चांगली करण्याचे मागे सर्वजण लागले आहेत. परदेशातून आलेले टॅटू काढण्याचे फॅड आता इतके वाढले आहे की अनेकांना त्यामुळे चांगला रोजगारही मिळत आहे, परंतू एका नवऱ्याने लाडक्या बायकोला खूश करण्यासाठी काढलेल्या एका ट्यटूने बायको खूष होण्याऐवजी रागावली आहे. हा टॅटू सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे.
स्वत:च्या शरीराच्या विविध भागांवर आपआपल्या व्यक्तीमत्वाला सूट होतील असे टॅटू काढण्यासाठी हल्ली बक्कळ पैसे खर्च केले जात असतात. अनेक जणांना त्यामुळे चांगला रोजगार मिळत आहे. शरीरावर पूर्वी गोंदवून घेण्याची परंपरा महिलांमध्ये भारतामध्ये होती. आजही काही भागात ही प्रथा सुरू आहे. आता नवनविन प्रकारचे टॅटू काढून मिळत आहेत. हल्ली तर चित्रासारखे हुबेहुब टॅटू काढून मिळत आहेत. यात स्वत:च्या लाडक्या व्यक्तीचा चेहराही काढून मिळत असतो.
अशाच पद्धतीने एका टीकटॉक स्टारने स्वत:च्या शरीरावर काढलेला पत्नीचा टॅटू सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे. या व्यक्तीने बायकोला खूश करण्यासाठी काढलेले हा टॅटू खूपच मजेदार आहे. हा टॅटू पाहून तुम्हालाही हसायला येईल, वास्तविक हा टॅटू मागची कल्पकता पाहून सोशल मिडीया त्याला खूपच लाईक्स मिळत आहेत.
शरीरावर काढला बायकोचा चेहरा
जेरी आणि त्याची पत्नी टेगन हे दाम्पत्य टिकटॉकवर खूपच प्रसिद्ध आहे. त्यांचे सोशल मिडीयावर हजारो फॉलोअर्स आहेत, ते चांगले व्हिडिओ बनवित असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यात जेरीने त्याच्या शरीरावर बनवलेला टॅटू दाखवला आहे. या टॅटू मध्ये त्याने त्याच्या पत्नीचा चेहराच चित्रीत केला आहे. जो खूपच मजेदार दिसत आहे. हा टॅटू जेव्हा ती तिच्या मित्रांसोबत हसत होती आणि विनोद करत होती. त्याच्या एक्सप्रेशनचा आहे. तो खूपच मजेदार दिसत आहेत. त्यात तिच्या चेहऱ्यावर विचित्र आणि मजेदार भाव आहेत. त्यामुळे हा टॅटू व्हायरल झाल्याचे डेली स्टार न्यूज वेबसाइटने म्हटले आहे.