न्यूयॉर्क : विमानाचे एक इंजिन होते, तेही बंद पडले. आपण आता मरणार आहोत, हे त्याला कळले. आणि त्याने बायकोला मोबाईलवरून टेक्स्ट मॅसेज धाडला आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलशी संपर्क तुटला अन् काही क्षणात त्यांचे विमान कोसळले. आपले मरण समोर दिसत असताना या पायलटने बायकोला जो संदेश पाठवला आहे, तो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
अमेरिकेतील एका वैमानिकाला जेव्हा कळले की विमानाला असलेल्या सिंगल इंजिनाने प्रतिसाद बंद केले आहे. तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवरून पायलटच्या सीटवरुन बायकोला शेवटचा संदेश पाठवला. तो आता चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या तांत्रिक बिघाड सुरू झाला तेव्हा बायकोला शेवटचा गुड बाय करताना त्याची काय मनस्थिती असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी.
ओहीओ शहरातील क्लेव्हलँड येथे राहणाऱ्या बेंजामिन चाफेट्झ ( 45) आणि बोरूच तौब ( 40) या दोन पायलटनी गुरुवारी 19 जानेवारीच्या सायंकाळी जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुयाहोगा विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले त्यावेळी आपले हे शेवटचे उड्डाण ठरेल याची त्यांना कल्पना नसेल. ते सिंगल इंजिनाच्या बीचक्राफ्ट ए 36S या छोट्या विमानात बसले होते.
बेंजामिन याने आपल्या पत्नीली प्लेन क्रॅश होण्यापूर्वी त्याने लिहीले की, “मी तुझ्यावर आणि मुलांवर प्रेम करतो. मी केलेल्या प्रत्येक
चुकी बद्दल मला दिलगीरी व्यक्त करतो, ये रेहल्लीम आमचे इंजिन बिघडले आहे. ये रेहल्लीम, सर्वांना बोलवा आणि सामुदायिक तेहिलीम करा ” असा संदेश त्याने पाठवला असून तो व्हायरल होत आहे. “I love you and the kids. I am sorry for everything I have done. Aay rehillim. We lost engines. तेहल्लिम ही ज्यू लोकांची हिब्रु धार्मिक पुस्तकातील एक परंपरा आहे.
न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर विमानतळापासून दोन मैलावरील जंगलात त्यांचे विमान कोसळले. त्याच्या अपघातानंतर सुमारे पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर त्या दोघांचे मृतदेह सापडला आहे. त्यानंतर त्यांचा मुतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. ज्यू पद्धतीने त्यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यक्रिया करण्यात आली. ते दोघेही अनुभवी पायलट होते. पाऊस आणि वारे असल्याने ड्रोनचा वापर न करता त्यांचे अपघातग्रस्त विमानाचे शोधकार्य करण्यात आले. पायलट बेंजामिन याने त्याच्या बायकोला पाठविलेला शेवटचा हळवा संदेश खूपच व्हायरल होत आहे.