माकडाला पकडायला बिबट्या वीजेच्या वेगाने आला, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मारली झेप, मग जे झाले ते…

| Updated on: Apr 07, 2023 | 4:26 PM

स्नो लेपर्डचा एक बर्फाच्या डोंगरातील व्हिडीओ समाजमाध्यमावर गाजत असतानाच आता बिबट्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातही बिबटे किती चपळ असतात याची प्रचिती मिळतेय

माकडाला पकडायला बिबट्या वीजेच्या वेगाने आला, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मारली झेप, मग जे झाले ते...
Leopards
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : माकडांना झाडावर उड्या मारताना आपण नेहमीच पाहत असतो. पण, तुम्ही कधी बिबट्याला या झाडावरून त्या झाडावर झेप घेताना कधी पाहिले आहे काय ? जर बिबट्याच्या या कौशल्य गुणांची तुम्हाला काही कल्पना नसेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी या व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबटा आपल्या सावजाच्या मागे पळताना दिसत आहे. त्याचे सावज चपळ असे माकड आहे. पण या दोघांमध्ये जिंकते कोण ते पाहिल्यास आपल्या धक्का बसेल.

इंडीयन फोरेस्ट सर्व्हीस ऑफीसर सुशांत नंदा यांनी एक बिबटा शिकार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबटा माकडांच्या पाठी झाडावर चढताना दिसत आहे. त्यामुळे झाडावर बसलेल्या तीन माकडांपैकी एक माकड बिबट्याला पाहून थेट जमिनीवर उडी मारते. तेव्हा बिबटाही त्याला पकडण्यासाठी जमिनीवर उडी मारतो. त्यानंतर ते माकड दुसऱ्या झाडावर चढून पुन्हा त्याच झाडावर येते. तसा बिबटाही त्या दुसऱ्या झाडावर चढून त्याला पकडतो आणि आपली शिकार करतो हे पाहून आपल्याला धक्का बसू शकतो.

बिबटे हे खूपच चपळ असतात. ते प्रसंगी झाडांवर चढूनही आपली शिकार करू शकतात. तसेच ते डोंगरावर चढूनही शिकार करतात. अलिकडेच बर्फातल्या बिबट्याने एका कोकराची केलेल्या शिकारीचा असाच एक हादरविणारा व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला समाजमाध्यमावर एक लाख 51 हजार 700 जणांनी पाहीला आहे. तर 1 हजार 912 लोकांनी त्यास लाईक्स केले आहे.

हाच तो आश्चर्यकारक व्हिडीओ पाहा…

 

या व्हिडीओला susanta Nanda यांनी दिलेली कॅप्शन देखील सुंदर लिहीली आहे. बिबटे हे केवळ संधीसाधू ( अवसरवादी ) नाहीत तर बहुमुखी शिकारी आहेत. या व्हिडीओला पाहून लोकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. आंध्रप्रदेश सरकारचे सल्लागार एस. राजीव कृष्ण यांनी विचारले आहे की, इतक्या उंचीवरून पडल्यावर बिबटे जखमी होत नाहीत का ? त्यावर अन्य एका युजरने उत्तर देताना म्हटले आहे की त्यांचे शरीर इतकं रबरासारखे लवचिक असते की त्यांना कमी जखमा होतात. त्याचं आपल्या शरीरावर खूपच नियंत्रण असते.