नवी दिल्ली : विसरभोळेपणावर (Forgetfulness) कोणतेच औषध नाही. पुरुषांच्या विसरभोळेपणाचे किस्से तर तुम्ही ऐकलेच असेल. शॉपिंग मॉलमध्ये, सराफा बाजारात ते अनेकदा बायकोलाच विसरुन थेट घरी येतात. अथवा कुठल्या तरी कामासाठी परस्पर निघून जातात, हे अनेकदा आपण ऐकले असेलच. पण देशातील या चार मेट्रो शहरातील (Metro Cities) प्रवाशी काय काय विसरले याची एक भली मोठी लांबलचक यादी उबेर (Uber) या कंपनीने समोर आणली आहे. टीव्ही, कमोड, मोबाईल आणि इतर इतक्या किंमती वस्तू लोक विसरले की विचारता सोय नाही. कोणी बायको टॅक्सीत विसरले की नाही, या मिश्किल प्रश्नाचे उत्तर कंपनीने दिले नसले तरी, प्रवाशी काय काय विसरले हे मात्र कंपनीने समोर आणले आहे.
Lost And Found List
तर उबेरने हरवलं-सापडलं, अशी एक यादी तयार केली. तिचा अहवाल सादर केला. यामध्ये प्रवाशी टॅक्सी, कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरेल. कोणत्या दिवशी सर्वाधिक वस्तू विसरल्या जातात. त्याची वेळ अशा तपशीलाचा एक छान अहवालच तयार केला आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांच्या विसरभोळेपणाचा एक ताजा अहवालाच समोर आला आहे. काय आहे या अहवालात…
शनिवार हा घात वार
या 10 वस्तू प्रवाशी विसरले
10 सर्वात जास्त विसरणाऱ्या वस्तू
5 रंगांच्या वस्तू विसरल्या
असे मिळविता येते सामान