नवी दिल्ली : सिंहाला (Lion) सगळ्यात खतरनाक प्राणी (aminal) म्हणून ओळखलं जातं, वाघाचे शिकार करीत असतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे सिंह ज्यावेळी शिकार करतो, त्यावेळी पुर्ण ताकतीनिशी हल्ला करतो असं अनेक व्हिडीओमधून पाहायला मिळालं आहे. बरं असे काही प्राणी त्यांच्यापासून वाघ लांब राहणं पसंत करतो. असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सिंह पाण्यातल्या प्राण्याला घाबरुन लांब पळत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेक कमेंट आल्या आहेत. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये आपल्या घरातलं पाणी पिल्यामुळे पानघोड्याला राग आला आहे. हा दक्षिण आफ्रिका देशातील आहे. तिथं काही पर्यटकांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या समोर ही घटना घडली. ती त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला सिंह एका कोपऱ्यात पाणी पीत आहे. काहीवेळात पानघोडा वाघाकडे पाहत उभा राहिला आहे. ज्यावेळी पानघोडा वाघाच्या दिशेने धाव घेतो. त्यावेळी सिंह पटकन पाठीमागे सरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर तीन सिंह असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
हा व्हिडीओ साधारण 15 तासापुर्वी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ १ लाख लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 8 हजार लोकांनी लाईक केले आहे. लोकांनी त्या व्हिडीओला वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत.
एक नेटकरी म्हणतो की, आता जंगलचा राजा कोणं ?