मुंबई : जर तुम्हाला वन्यजीव प्राणी (ANIMAL) अधिक आवडत असतील, तर तुम्हाला हा व्हिडीओ सुध्दा अधिक आवडण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा त्यावर कमेंट करणार एवढं मात्र निश्चित. दोन गेंड्यांचा आणि सिंहांचा एक व्हिडीओ (Rhinoceros and lions Viral video) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. The Figen या नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा 30 सेकंदाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. दोन गेंडे ज्यावेळी रस्त्यातून चालत असतात. त्यावेळी जंगलचा राजा सिंह वाटेत बसलाय. गेंडे जवळ आल्यानंतर दोन सिंहानी काय केलंय हे तुम्ही व्हिडीओ (Viral Video) पाहू शकता.
ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गेंडा पुन्हा जंगलाचा राजा आहे!” व्हिडिओला जवळपास 7 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलं आहे. या क्लिपवर ट्विटर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा महापूर उडाला. एका यूजरने लिहिले, “काय चालले आहे?” दुसऱ्याने लिहिले – सिंहाला जंगलाचा राजा कोणी केले?
त्या व्हिडीओमध्ये जंगलातील दोन गेंडे ज्यावेळी रस्त्याने चालत येतात, त्यावेळी वाटेत बसलेले दोन सिंह त्यांना पाहतात. गेंडे जवळ येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह रस्त्यातून उठून उभे राहतात. परंतु तरीही गेंडे पुढे येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह पुढे सरकतात आणि पाठीमाग बघत जंगलात निघून जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
Then the rhino is the king of the forest!pic.twitter.com/EgE0NlpkGK
— The Figen (@TheFigen_) April 5, 2023
आतापर्यंत सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओ दोन प्राण्यांचे भांडणाचे आहेत. तर काही व्हिडीओ दोन प्राणी एकत्र फिरत असल्याचे आहेत.