मुंबई : सोशल मिडीया वन्य प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ नेहमीच मनोरंजन करीत असतात. तुम्हाला वन्य प्राण्यांबद्दल जर प्रेम असेल तर हे व्हिडीओ तुम्हाला ज्ञान देण्याबरोबरच तुमचे मनोरंजनही करतील. सोशल मिडीयावर सध्या जंगलाच्या राजा सिंहाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपण जंगलाचा राजा म्हणून आतापर्यंत सिंहाला मान देत होतो, परंतू हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या हा विचार बदलावा लागेल असा हा चमत्कारिक व्हिडीओ आहे. तर पाहुयात हा व्हिडीओ चला…
जर तुम्ही वन्यप्रेमी आहात, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. सोशल मिडीयावर नेहमीच मजेशीर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या The Figen नावाच्या युजरने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर झाला असून ३० सेंकदाच्या या व्हिडीओ क्लीपमध्ये मजेशीर दृश्य आहे. या व्हिडीओमध्ये जंगलाचा राजा मानला जाणाऱ्या सिंहाची जोडी आराम करताना दिसत आहे. मातीच्या ओबडधोबड जंगलातील रस्त्यावर ही राजाची जोडी आराम करीत असताना तेवढ्यातच तेथे गेंड्यांची एक जोडी भटकत भटकत येते. या गेंड्यांना पाहून राजा असलेला सिंह चक्क उभा राहतो आणि आपली गेंड्यांना आपली वाट मोकळी करून देताना दिसत आहे. हे सिंह या गेंड्यांपासून शक्य तेवढे दूरवर जाताना दिसत आहेत.
Then the rhino is the king of the forest!pic.twitter.com/EgE0NlpkGK
— The Figen (@TheFigen_) April 5, 2023
या मजेशीर व्हिडीओला पोस्ट करताना पोस्टकर्त्याने कॅप्शनही मजेदार लिहीली आहे. कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ” तर मग गेंडा आता जंगलाचा राजा आहे !” या व्हिडीओला 8 लाख 72 हजार 700 व्यूज आहेत. तर 9 हजार 754 युजरनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. या क्लिपवर अनेक मजेशीर प्रतिक्रीया आल्या आहेत. एका म्हटले आहे यह क्या हो रहा है ? दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की सिंहाला जंगलाचा राजा कोणी बनविले ?