मिस्टर बीस्ट (Youtuber MrBeast) च्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरती एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने एका हॉटेलमध्ये एका रेस्टॉरंटमधील वेट्रेसला त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालावा, त्याचबरोबर त्याला प्रोत्साहन देण्यात द्यावं यासाठी नवीन कार भेट दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मिस्टर बीस्ट याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर तो लोकांच्या अधिक पसंतीला सुध्दा पडला आहे. मिस्टर बीस्ट याचे खरं नावं जिमी डोनाल्डसन आहे. विशेष म्हणजे, जिमी डोनाल्डसन याचे युट्यूबला (YouTuber) सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
त्याने सोमवारी एक व्हिडीओ तयार केला आहे, 42-सेकंदाचा तो व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओमध्ये एमी नावाची एक महिला हॉटेलमध्ये काम करीत आहे. मिस्टर बीस्ट याने तिला अशी टीप दिली आहे की, सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर त्या काम करणाऱ्या महिलेने म्हटले आहे की, आतापर्यंत मिळालेली सगळ्यात मोठी टीप 50 डॉलर एवढी होती.
मिस्टर बीस्ट यांनी ज्यावेळी एमी नावाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या हातात काळ्या टोयोटा कारची चावी दिली. जिमी डोनाल्डसन याने नंतर विचारलं की, “कधी कारची टीप कोणी दिली आहे का ?”
मिस्टर बीस्टने तिला नवीन कारमध्ये बसवण्यापूर्वी तिला काय देणार आहे असे विचारले. कारच्या बाजूला त्याच्या चॉकलेट कंपनीचा Feastables लोगो बनवला आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांनी लाईक केला आहे. 8 हजार पेक्षा अधिक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर 11 मिलियन लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे. लोकांनी कमेंटच्या माध्यमातून त्याचं कौतुक देखील केलं आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांनी लाईक केला आहे. 8 हजार पेक्षा अधिक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर 11 मिलियन लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे.
एक नेटकरी म्हणतोय की, मला मिस्टर बीस्ट पाहायला खूप आवडतं. अशी अद्भूत कामगिरी चालू राहू द्या अशी कमेंट आणखी एकाने केली आहे. आणखी एकजण म्हणाला, चांगलं बननं बंद करा, कोणाला काही फरक पडत नाही.