Video | धाडसी माणूस चार मगरींना एकाचवेळी स्वत:च्या हाताने जेवणं देतोय, व्हिडिओ पाहणारे म्हणतात ‘अजिबात घाबरत नाही’

| Updated on: Apr 18, 2023 | 2:39 PM

व्हायरल झालेल्या काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीच्या किनारी पोहचला आहे. त्यावेळी त्याच्या हातात मगरींसाठी खायच्या वस्तू आहेत. तो ते पिशवीतं असलेलं अन्न हळूहळू हाताने बाहेर काढताना दिसत आहे.

Video | धाडसी माणूस चार मगरींना एकाचवेळी स्वत:च्या हाताने जेवणं देतोय, व्हिडिओ पाहणारे म्हणतात अजिबात घाबरत नाही
Animals Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : काही सेकंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. एक व्यक्ती नदीच्या किनारी बसून मगरींना खायला देत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ (Animals Video) रोज व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Internet Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कारण एक व्यक्ती मगरींना (Crocodiles) काहीतरी खायला देत आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर एकदम फास्ट व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत.

व्हायरल झालेल्या काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीच्या किनारी पोहचला आहे. त्यावेळी त्याच्या हातात मगरींसाठी खायच्या वस्तू आहेत. तो ते पिशवीतं असलेलं अन्न हळूहळू हाताने बाहेर काढताना दिसत आहे. ती व्यक्ती तिथं त्याला खायला घालत आहे, त्यानंतर तिथून निघून जात आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती खायला देत असताना मगर अजिबात त्या व्यक्तीवर हल्ला करीत नाही. तो व्हिडीओला अधिक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडीओने अनेकांचं मन देखील जिंकलं आहे. सोशल मीडियावर लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘या पद्धतीचा व्हिडिओ यापूर्वी कधीच पाहिला नाही.’ दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘खूप छान व्हिडिओ.’ तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमधूनही असे व्हिडीओ उजेडात आले आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.