मुंबई : आपल्या देशात काही लोकं अशी आहेत, जी खतरनाक प्राण्यांना (Tiger Attack Video Viral) अजिबात घाबरत नाहीत. सोशल मीडियावर खतरनाक जनावरांचे अनेक व्हिडीओ (Animal Viral Video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओमध्ये माणूस आणि प्राणी यांच्यात किती प्रेम आहे, हे पाहायला मिळत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आम्हाला कमेंट करुन सांगा, की व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं.
त्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती जंगलात आरामात बसला आहे. त्या व्यक्तीला अजिबात टेन्शन नाही. किंवा त्याला असं वाटतं सुध्दा नाही की, आता माझ्यावरती कुठलाही प्राणी हल्ला करु शकतो. तो मोबाईलमध्ये बघून व्हिडीओ तयार करीत आहे. त्याचवेळी अचानक मागच्या बाजूने वाघ येतो. मग पुढे काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा. वाघाला पाहिल्यानंतर जंगलातील इतर प्राणी सुध्दा पळून जातात.
just is fooling arround pic.twitter.com/ee9Dw52EcK
— Animal Smackdown (@animalsmack) July 6, 2023
वाघाने त्या व्यक्तीवर हल्ला केला आहे. वाघाच्या पायात इतकी ताकद असते की, तो हल्ला करताना पुर्ण ताकदीनिशी करीत असतो. त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, त्या वाघाने त्या व्यक्तीवर मागच्या बाजूने हल्ला केला आहे. परंतु विशेष म्हणजे ती व्यक्ती खाली पडल्यानंतर तोचं वाघ त्या व्यक्तीवर प्रेम करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीने वाघाचं प्रेम सुध्दा स्विकारलं आहे. त्याचवेळी तिथं एक व्यक्ती उपस्थित आहे. ती व्यक्ती हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करीत आहे.
त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल की, दोघे एकमेकांचे दोस्त आहेत. एक व्यक्ती त्या वाघाची मजा घेत आहे, त्याचबरोबर वाघ सुध्दा त्या व्यक्तीची मजा घेत आहे. त्यामुळे त्या वाघाने त्या व्यक्तीवरती जोरदार हल्ला केलेला नाही.