VIDEO | ऑफिसमध्ये मॅनेजरने आपल्या टीमसोबत नाटू नाटू गाण्यावर केला डान्स , स्टेप्स शिकवल्या, नेटकरी म्हणतात, ऑफिस असावं तर…

| Updated on: Mar 28, 2023 | 7:55 AM

व्हिडीओच्या सुरुवातीला मॅनेजर ऑफिसमध्ये त्याच्या सहकार्यांना डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. त्याचवेळी सोबत असलेली टीम डान्स स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे.

VIDEO | ऑफिसमध्ये मॅनेजरने आपल्या टीमसोबत नाटू नाटू गाण्यावर केला डान्स , स्टेप्स शिकवल्या, नेटकरी म्हणतात, ऑफिस असावं तर...
Naatu Naatu
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) कधी कोणती गाणी व्हायरल होतील, याचा काही नेम नाही, त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काही सुद्धा करायचा तयार असतात हे आपण अनेकदा व्हिडीओतून पाहिलं सुद्धा आहे. आरआरआर (RRR) चं एक गाण नाटू नाटू (Naatu Naatu) हे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायरल झालं होतं. आजही त्या गाण्याची अधिक क्रेझ आहे. हे गाणं ज्यावेळी लोकांनी पाहिलं त्यावेळी काही लोकांनी घरात तर, काही लोकांनी रस्त्यात, तर काही लोकांनी सिनेमा गृहात डान्स करुन त्याचा आनंद लुटला. सोशल मीडियावर आजही त्या गाण्याच्या विविध स्टेप्स पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मॅनेजर आपल्या टीमसोबत नाटू नाटू या गाण्यावर डान्स करीत असताना पाहायला मिळत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला मॅनेजर ऑफिसमध्ये त्याच्या सहकार्यांना डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. त्याचवेळी सोबत असलेली टीम डान्स स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘कीपिंग इट रियल ऑन मंडे’ लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकं वारंवार पाहत आहेत. एक नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ऑफिस असावं तर असं. आणखी एक नेटकरी म्हणतो, तिथं नोकरीची जागा शिल्लक आहे का ?

सोशल मीडियावर त्या गाण्याचे आतापर्यंत अनेक व्हिडीओ आहेत. विशेष म्हणजे त्या गाण्यावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी सुध्दा थिरकले आहेत. या गाण्यावर जगातील अनेक लोकांनी डान्स केला आहे.