मॅनेजरची महिला कर्मचाऱ्याला मीटिंगमध्ये सूचना, पहिला तुझा माईक बंद कर, कारण…

| Updated on: May 23, 2023 | 11:36 AM

VIRAL NEWS : वंदनाला ही गोष्ट मॅनेजरने ग्रुपमध्ये मेसेज केल्यावर समजली, त्याबरोबर त्यांचा मेसेज लोकांना विचार करायला भाग पाडणार आहे. मॅनेजरने अशी कमेंट का केली.

मॅनेजरची महिला कर्मचाऱ्याला मीटिंगमध्ये सूचना, पहिला तुझा माईक बंद कर, कारण...
viral msg
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from Home) करणाऱ्या लोकांच्या तुम्ही कहाण्या ऐकल्या असतील, प्रत्येकाच्या कामानुसार समस्या वेगळ्या आहेत. काही लोकांच्या गोष्टी इतक्या मजेशीर आहेत की, अनेकांना हसू सुद्धा आवरत नाही. त्याबाबतच्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल (viral news) झाल्या आहेत. घरातून काम करणाऱ्यांच्या अनेक गोष्टी आणि त्याचे मीम्स व्हायरल (mims viral) झाले आहेत. मीटिंग सुरु असताना अचानक कुत्रामध्ये येणं, मांजरमध्ये येवून चहाचा कप सांडणं अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोरोनाच्या काळात घरातून काम करीत असताना रोज नव्या समस्या पाहायला मिळत होत्या.

ती महिला चिप्स खात…

वंदना जैन यांची सध्या व्हायरल झालेली पोस्ट एकदम मजेशीर आहे. 28 वर्षीय महिला घरातून एका मिटिंगमध्ये सहभागी होते. त्याचबरोबर ती महिला चिप्स खात आहे. त्याचवेळी त्या महिलेला माहित नव्हतं की, लॅपटॉपवरती तिचा माइक्रोफोन सुरु आहे. ज्यावेळी मिटिंग सुरु होती. त्यावेळी ती खात असलेल्या चिप्सचा आवाज सगळ्यांना जात होता.

हे सुद्धा वाचा

वंदनाला या गोष्टीची माहिती मॅनेजरने ग्रुपमध्ये मेसेज केल्यानंतर माहिती झाली. तो मेसेज तुम्हाला सुध्दा विचार करायला भाग पाडणार
आहे.

पोस्टला 3 लाख लाखांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे झालेल्या चुकीमुळे लोकांचं हसणं थांबत नाही. काही लोकांनी असं म्हटलं आहे की, काही लोकांनी अशा पद्धतीने सामना केला असावा. काही लोकांनी कमेंटमध्ये मीम्स व्हायरल केले आहेत.

आता, आम्हाला ही गोष्ट सुध्दा माहित नाही की, मीटिंगमध्ये नाष्टा करीत असताना वंदनाला कसला त्रास झाला की नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की, त्यांच्या टीममधील सहकारी अधिक हसले असतील.

सोशल मीडियावर लोकांच्या मजेशीर गोष्टी वाचायला आणि पाहायला लोकांना अधिक आवडतात. त्याचबरोबर लोकं त्या गोष्टी मुद्दाम आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात.