Accident footage of metro rail : आपण नेहमीच आपल्या फोनच्या स्क्रीनवर व्यस्त असतो, परंतु काही वेळा ते प्राणघातक ठरू शकते. अशाच एका घटनेत, सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, आपला मोबाइल (Mobile) फोन पाहण्यात व्यस्त असलेला एक व्यक्ती दिल्लीत मेट्रो ट्रेनच्या रुळावर पडला. हा माणूस त्याच्या मोबाइलमध्ये व्यस्त तर होताच पण ते करता करता प्लॅटफॉर्मच्या काठावर चालत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला, त्यानंतर तो मेट्रो ट्रेनच्या रुळावर पडला, यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो तिथेच बसून राहिला. पुढच्या फ्रेममध्ये, तो माणूस उठण्यासाठी धडपडताना दिसतो तर काही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान त्याच्या मदतीला धावताना दिसतात. अपघाताचा व्हिडिओ धक्कादायक आहे.
सुदैवाने गंभीर दुखापत नाही
मोबाइलमध्ये व्यस्त असलेला माणून इतका नशीबवान होता, की त्या माणसाच्या समोरच प्लॅटफॉर्मवर CISFचे जवान तैनात होते. मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी ते रुळावर चढले आणि प्लॅटफॉर्मवरून ओढत त्या माणसाला सुरक्षित ठिकाणी नेले. सुदैवाने, 58 वर्षीय शैलेंद्र मेहता म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
CISFचे निवेदन
राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात शाहदरा मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी ही घटना घडली. सीआयएसएफच्या निवेदनात म्हटले आहे, की प्लॅटफॉर्मवर चालत असताना मोबाइल फोनमध्ये व्यस्त असलेला एक पुरुष प्रवासी पुढे जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून घसरला आणि मेट्रो ट्रॅकवर पडला. सीआयएसएफ क्यूआरटी टीमचे कॉन्स्टेबल रोथश चंद्र यांनी वेगाने तिकडे धाव घेतली आणि ते मेट्रो ट्रॅकवर उतरले. मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी त्यांनी त्या प्रवाशाला रुळावरून ओढले. हा व्हिडिओ CISFने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
A passenger namely Mr. Shailender Mehata, R/O Shadhara, slipped and fell down on the metro track @ Shahdara Metro Station, Delhi. Alert CISF personnel promptly acted and helped him out. #PROTECTIONandSECURITY #SavingLives@PMOIndia @HMOIndia @MoHUA_India pic.twitter.com/Rx2fkwe3Lh
— CISF (@CISFHQrs) February 5, 2022