VIDEO | जुन्या यामाहा गाडीचा असा स्टंट तुम्ही कधी पाहिलाय का ? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास…

| Updated on: May 13, 2023 | 10:12 AM

VIDEO VIRAL | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपली बाईक जोरात चालवत आहे. त्याचबरोबर त्यावर स्टंट करीत आहे. हे सगळं पाहून लोकांना धक्का बसला आहे.

VIDEO | जुन्या यामाहा गाडीचा असा स्टंट तुम्ही कधी पाहिलाय का ? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास...
bike stunt (3)
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होण्यासाठी अनेकजण अनोखे स्टंट (Bike Stunt) करीत असल्याचे अनेकदा उजेडात आलं आहे. भयानक स्टंट करीत असताना अनेकांचा अपघात (Accident) सुध्दा झाला आहे. त्यामध्ये काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपली बाईक रस्त्यावर चालवून स्टंट करीत आहे. त्या व्यक्तीचा स्टंट पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर काही लोकांना घाम फुटला असणार एवढं मात्र निश्चित. दोन दिवसापुर्वी एका मुलीने पार्किंग केलेल्या बाईकवरती आपली कार चढवली, त्याचा व्हिडीओ सुध्दा अजून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या तरुण अधिक गाड्या पळवतात आणि त्यावर एखादा स्टंट करतात. स्टंट करीत असताना छोटीसी जरी चुकी झाली, तरी मोठा अपघात होऊ शकतो. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

बाईकवरती खतरनाक स्टंट

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ लोकांनी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ allahjan46 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेकजण आपल्या बाईकवरती स्टंट करीत आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीचा स्टंट पाहून अनेकांना घाम फुटला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही तरुण आहेत. ते आपल्या बाईकवरती स्टंट करीत आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्टंट केल्यानंतर ते आपल्या बाईकवरती बसत आहेत. हा व्हिडीओ अनेक लोकांचं मनोरंजन करीत आहे.

हा व्हिडीओ १४ लाख लोकांनी पाहिला

सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झालेला व्हि़डीओ १४ लाख लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओ ७९ हजार पेक्षा अधिक लोकांना लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक जलद व्हायरल झाला आहे. समजा ती व्यक्ती स्टंट करीत असताना पडली असती. तर मोठा अपघात झाला असता. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.