मुंबई : दिल्लीतील मेट्रोचा (Delhi Metro announcements) आधार लोकांना चांगलाचं झाला आहे. मागच्या २० वर्षात प्रवाशांसाठी मेट्रो लाईफलाईन झाली आहे. वेळेनुसार बरंच काही बदललं आहे. परंतु मागच्या २० वर्षापासून मेट्रोमधील आवाज एक सारखा आहे. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ (Delhi Metro video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शम्मी नारंग आणि रिनी साइमन खन्ना (Shammi Narang and Rini Simon Khanna) यांच्या आवाजाची अनेकांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला, पण ते कुणालाही शक्य झालेलं नाही. कृष्णांश शर्मा नावाचा व्यक्ती दिल्लीतील मेट्रोच्या आवाजामुळे अधिक प्रसिध्द झाला आहे.
व्हिडीओमध्ये काही ओळी लिहील्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, दिल्ली मेट्रोमधील घोषणेची हुबेहुब नक्कल करताना. त्या व्यक्तीच्या मागच्यावेळी एका रीलला चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे मी आता हे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती मेट्रो कोचच्यामध्ये बसलेल्या व्यक्ती शम्मी नारंग यांच्या आवाजातील घोषणेची हुबेहुब नक्कल करीत आहे. त्यावेळी त्या मित्रासोबत असलेले सगळेजण हसत आहेत. त्याचबरोबर मिमिक्री करुन हसत देखील आहे. सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा आवाज अधिक प्रसिध्द झाला आहे.
एक नेटकरी मस्करीमध्ये म्हणत आहे की, हे मी ऐकून आईएसबीटी स्टेशनला उतरलो, मी हेडफोन लावले होते. दुसऱ्या नेटकरी म्हणाला की, तु प्रसिध्द होत आहेस भावा. तिसरा नेटकरी म्हणत आहे, भावा हे सगळं हे एकून खूप चांगलं वाटलं आहे. हे सगळं व्हायरल होत आहे.
एक महिना आगोदर या व्यक्तीने एक व्हिडीओ तयार केला होता. त्यावेळी ही व्यक्ती मेट्रोच्या गर्दीत घोषणा करीत असल्याचे पाहायला मिळाले होते.