मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. त्यामध्ये जे काही घडलं आहे, ते अधिक मजेशीर असल्यामुळे लोकांना तो व्हिडीओ अधिक आवडला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा हसल्याशिवाय राहणार नाही. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक हसवतात. सध्या सोशल मीडियावर (trending video) तसाचं एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला (Viral Video) लग्नासाठी प्रपोज करणार होता. तिथं गेल्यानंतर नेमकं काय झालं ? हे तु्म्ही व्हायरल व्हिडीओत पाहा.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळत आहे की, एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाचा प्रस्ताव देणार होता. त्यावेळी तो आपल्या पॅन्टच्या खिशातून अंगठी बाहेर काढणार होता. खिशातून अंगठी बाहेर काढत असताना त्याची अंगठी खाली पडते. हे सगळं पाहून त्या गर्लफ्रेंड अधिक हैराण होते. अंगठी नदीच्या पाण्यात पडल्यामुळे तो तरुण सुध्दा नदीच्या पाण्यात उडी मारतो. सोशल मीडियावरती हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
Great marriage proposal ?? pic.twitter.com/CdtH9l9NZw
— CCTV IDIOTS (@cctvidiots) May 25, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडीओला cctvidiots नावाच्या ट्विटर खात्यावरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 67 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला कमेंट सुद्धा अधिक आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत असताना, बिचाऱ्याचं नशीब खराब असल्याचं म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सगळं काही खराब झालं असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांना सुध्दा अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतं.