मुंबई : काहीवेळेला अशा गोष्टी कॅमेऱ्यात (CAMERA CATURED) कॅप्चर होतात, की त्यामुळे लोकांना धक्का बसतो. त्याचबरोबर सोशल मीडियावर आतापर्यंत अशा गोष्टी व्हायरल (VIRAL STORY) झाल्या आहेत की, त्या पाहत असताना अनेकांचा डोळ्यांवरचा विश्वास उडाला आहे. सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओ (VIRAL VIDEO) असे आहेत की, ते लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटमध्ये राग सुध्दा व्यक्त केला आहे.
व्हिडीओ पाहताना लोकं हैराण झाली आहेत. एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला आपली बाईक उभी करीत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीसोबत जे काय घडलं आहे, ते तिथल्या सीसीटिव्हीत कैद झालं आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. बाईक उभी करीत असताना एक व्यक्ती खड्ड्याच्यावरती उभा आहे. तिथं खाली एक खड्डा आहे, त्यावर कायतरी झाकलं आहे. ज्यावेळी ती व्यक्ती बाईक उभी करीत आहे. त्यावेळी तिथं असलेल्या खड्ड्याकडं त्याचं लक्ष नाही. त्यानंतर काय झालंय तुम्ही व्हिडीओत पाहा.
— ?? viral moments ?? (@suddenlyhapend) May 16, 2023
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती खड्ड्यांच्यावरती जे काय झाकलं आहे, त्यातून खाली पडली आहे. त्यानंतर त्याच्या अंगावर बाईक सुध्दा पडली आहे. त्यावेळी लोकं तिथं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले आहेत. खड्ड्यात पडलेली बाईक बाजूला केल्यानंतर ती व्यक्ती त्या खड्ड्यातून बाहेर येते. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. 16 मेला हा व्हिडीओ ट्विटरवरती शेअर केला होता. आतापर्यंत 36 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.