महिलेला वाचवण्यासाठी केलं डेरिंग, पण नंतर जे घडलं ते ऐकून तुमच्या हृदयाला धक्का बसेल

| Updated on: Apr 07, 2023 | 3:27 PM

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रेनच्या पटरीवर जीव द्यायला जात आहे. त्याचवेळी एक तरुण तिला वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण नंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

महिलेला वाचवण्यासाठी केलं डेरिंग, पण नंतर जे घडलं ते ऐकून तुमच्या हृदयाला धक्का बसेल
viral news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. काही व्हिडीओ मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ शिक्षणाशी संबंधित असतात. काही व्हिडीओ असे असतात, की त्यातून अनेकांना आनंद मिळतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तिथं एक मुलगी पटरीवर जाऊन ट्रेन खाली आत्महत्या (murder) करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी एक तरुण तिला वाचवण्यासाठी डेरिंग करतो. त्यानंतर काय झालंय ते व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला ज्यावेळी ट्रेन येते त्यावेळी आत्महत्या करण्यासाठी पुढे जात आहे. त्याचवेळी एक तरुण तिला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. एक सेंकद सुध्दा उशीर झाला असता, तरी त्या महिलेचा जीव गेला असता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळे एकदम शांत झाले आहेत.

हे सुद्धा वाचा


व्हायरल झालेल्या या व्हिडीओला अनेक कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवरती शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 15 लाख लोकांनी पाहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, हा खूप धोकादायक व्हिडिओ आहे. कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले आहे की, लोकांनी आयुष्याची खिल्ली उडवली आहे.