मुंबई : भारतात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही असं अनेकजण सहज बोलताना म्हणतात. पण हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर लोकांचं वाक्य या व्हायरल व्हिडीओला लागू होतं असं म्हणायला हरकत नाही. एका व्यक्तीने केलेला बेली डान्स (Belly Dance) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी त्या तरुणाचा चांगला डान्स केल्याचं कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याचबरोबर काही जणांनी तर त्या व्हिडीओची तुलना नोरा फतेही (Nora Fatehi) हीच्या बेली डान्ससोबत केली आहे.
या व्हायरल व्हिडीओला कावेरी नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवरती शेअर केले आहे. तो व्हिडीओ 48 सेंकदाचा आहे. त्या व्हिडीओमध्ये तरुणाने बेली डान्स करुन लोकांचं मन जिंकलं आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला म्युझिक सुरु असल्याचा आवाज सुध्दा व्हिडीओत येत आहे. हा व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला असल्याचे सांगितले आहे.
He is so bloody good at it! pic.twitter.com/fxNbzl4AKE
— Kaveri ?? (@ikaveri) January 18, 2023
हा व्हिडीओ एक लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. ट्विटर यूजर्स त्या तरुणाचा डान्स पाहून अधिक प्रभावित झाले असल्याचं कमेंटच्या माध्यामातून सांगत आहेत.
त्या व्हिडीओला अनेक कमेंट आल्या आहेत. त्यामध्ये काही लोकांनी तरुणाची तुलना थेट नोरा फतेही हीच्याशी केली आहे. तर काही तरुणांनी नोरा फतेही हीच्यापेक्षा तरुणाचा डान्स चांगला असल्याचं म्हटलं आहे.