अकरा हजार फूटावर विमान होते, पायलटला सिटखाली कोब्रा दिसला, मग काय झाले ?

| Updated on: Apr 06, 2023 | 9:15 PM

जेव्हा त्यांच्या सीटजवळ त्यांच्या पायाला काही तरी थंडगार लागले तेव्हा त्यांना वाटले की पाण्याची बाटली गळते आहे. तेव्हा त्यांनी डाव्या बाजूला पाहीले तर कोब्रा होता.

अकरा हजार फूटावर विमान होते, पायलटला सिटखाली कोब्रा दिसला, मग काय झाले ?
COBRA
Image Credit source: socialmedia
Follow us on

केप टाऊन  :  वैमानिकांना कोणत्याही कठीण प्रसंगात विमानाचे सुखरूप लॅंडींग करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. परंतू काही वेळा असे विचित्र अपघात किंवा प्रसंग घडतात की वैमानिकाची खरोखरच कसोटी लागते. जर उडत्या विमानात पायलटला विमानात साप असल्याचे दिसले तर त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेची चांगलीच परीक्षा ठरेल. असाच प्रकार एका वैमानिकाबाबत घडला आहे. दक्षिण आफ्रीकेतील पायलट रूडोल्फ इरासस्म यांना त्यांच्या विमानात कोब्रा दिसला परंतू त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने हे संकट टळले, कसे ते पाहूया…

११ हजार फूटावर विमान होते…

ज्यावेळी पायलट इरासस्म त्यांचे विमान ११ हजार फूटांवरून उडवित होते. त्यावेळी कॉकपिटमध्ये त्यांना विषारी कोब्रा दिसला. त्यांनी त्यानंतर जराही विचलित न होता. विमान प्रवाशांना विश्वासात घेत या विमानाला सुखरूपरित्या जमीनीवर उतरवले. ज्यामुळे उड्डाण तज्ज्ञांनी त्यांची स्तूती केली आहे. गेली पाच वर्षे ते पायलट म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी जेव्हा कळले की कोब्रा त्यांच्या सिट खालीच आहे. तेव्हा त्यांनी त्यांचा संयम कायम ठेवला आणि योग्य निर्णय पटापट घेतले.

पायाला थंडगार स्पर्श झाला आणि 

इरासम्स यांनी सांगितले की सोमवारी सकाळी जेव्हा विमान उडविण्यापू्र्वीची तयारी सुरू होती तेव्हाच वॉर्सेस्टर विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी या विमानाच्या विंगखाली एक कोब्रा पाहीला होता. त्यावेळी तपासणी केल्यानंतर काही आढळले नाही, त्यांना वाटले की कोब्रा निघून गेला. पायलटनी सांगितले की ते त्यांच्याजवळ पाण्याची बाटली ठेवतात. जेव्हा त्यांच्या सीटजवळ त्यांच्या पायाला काही तरी थंडगार लागले तेव्हा त्यांना वाटले की हीच पाण्याची बाटली गळते आहे. तेव्हा त्यांनी डाव्या बाजूला पाहीले तर कोब्रा त्यांच्या सिट खालीच डोके हलवत उभा होता.

प्रवाशांना विश्वासात घेतले

प्रवाशांना विमानात साप असल्याचे सांगून घाबरवणे योग्य आहे की अयोग्य असे सुरूवातीला पायलटला वाटले. त्यामुळे त्यांनी आधी ठरवले प्रवाशांना काही सांगायचे नाही. परंतू नंतर त्यांनी विमानातील प्रवाशांना विश्वासात घेतले. वेल्कम विमानतळाजवळ विमान तळ पोहचल्याने त्यांनी जोहान्सबर्ग नियंत्रण टॉवरला कळवते आपातकालिन लॅंडींगसाठी तयारी करायला सांगितले. आणि त्यानंतर विमानाचे सुखरूप लॅंडींग केले. इंजिनिअरनी विमानात कोब्राला शोधण्यासाठी त्याचे अनेक पार्ट वेगळे केले., परंतू रात्रीपर्यंत त्यांना तो सापडला नाही. त्यांनी सकाळी पुन्हा शोध मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.