मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) झाले आहेत. चांगले व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत, त्यामधून लोकांपर्यंत चांगला मेसेज जावा एवढात त्यामागचा हेतू असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस (punjab police) कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असताना, रखरखत्या उन्हात कचरा वेचणाऱ्या एका मुलाची कशा पद्धतीने मदत करतो हे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओ अनेक लोकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचं नेटकऱ्यांनी कौतुक देखील केलं आहे. कपडे आणि चप्पल दिल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काय सांगत आहे.
अभय गिरी यांच्याकडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये पंजाब राज्यातील एक पोलिस कर्मचारी दिसत आहे. त्याचबरोबर कचरा वेचणारा एक मुलगा आहे. पोलिस कर्मचारी त्या मुलाला जवळ घेऊन पाणी पाजत आहे. तो मुलगा कचरा वेचत असल्याचं एका वेबसाईनं म्हटलं आहे. काही सेकंदाच्या व्हि़डीओने लोकांचं मन जिंकलं आहे. पोलिस कर्मचारी सुरुवातीला त्या मुलाला नवीन चप्पल देत आहे. त्यानंतर त्या मुलाला नवीन पॅन्ट आणि शर्ट दिलं आहे. त्या मुलाने त्या पोलिस कर्मचाऱ्याचे आभार देखील मानले आहे. ज्यावेळी इतक्या वस्तू एकाचवेळी त्या मुलाला भेटल्या, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत 84 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याचं अभिनंदन केलं आहे. ‘पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या भेटवस्तूबद्दल हा मुलगा पोलीस कर्मचाऱ्याचे मनापासून आभारी असल्याचे नेटकऱ्यांनी कमेंट केले. काहींनी प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की, ‘रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कपडे आणि बूट यासारख्या मूलभूत गोष्टी देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.
अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला देखील पडले आहेत.