मुंबई : रस्त्यावर अनेक अपघात (Accident Viral Video) झाल्याचे पाहायलं मिळतं. त्यामध्ये काही लोकं जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात भर्ती करावं लागतं. काही भीषण अपघातामध्ये लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ (VIDEO) व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अनेक अपघात सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. काही घटना भविष्यात टाळता येतील अशा पद्धतीचे व्हिडीओ आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला. तो व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो गुजरात राज्यातील जामनगरमधील असल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये एक शहरातील बस स्पीडब्रेकरवरती जोरात आदळते. त्यावेळी त्या गाडीची मागची काच फुटते, त्यातून दोन मुलं बाहेर पडतात. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यावेळी पाठीमागे गाडी नसल्यामुळे दोन मुलं त्या अपघातातून बजावली आहेत.
सद्या व्हायरल झालेलं सीसीटिव्ही फुटेज एएनआईने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ गुजरात राज्यातील जामनगर परिसरातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बसमधून पडलेले दोन विद्यार्थी आहेत. गुलाबनगर परिसरातून ज्यावेळी बस जोरात स्पीडब्रेकरवरुन गेली त्यावेळी हा सगळा प्रकार घडला आहे. काच फुटलेली आणि विद्यार्थी खाली पडलेली माहिती चालकाना नव्हती, तो तसाच पुढे बस चालवत राहिला.
#WATCH गुजरात: जामनगर ने बस का शीशा टूटने से दो छात्र सड़क पर गिरे।
(वीडियो सोर्स: सीसीटीवी) pic.twitter.com/cL0e5l4HCu
— ANI_HindiNews (@AHindinews) April 20, 2023
गाडीची काच ज्यावेळी फुटून खाली पडते. त्याचवेळी दोन शाळेचे विद्यार्थी खाली पडतात. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर बस डेपोच्या व्यवस्थापकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत बस चालकाला निलंबित केले. त्याचवेळी बसच्या काचा फुटल्याने दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.