नागालँड : नागालॅंडचे मंत्री तेमजेन इमना सोशल मिडीयावर ( socialmedia ) नेहमीच अॅक्टीव असतात. मागे त्यांनी नागालॅंडच्या ( nagaland ) एका अशा घराचा फोटो ट्वीट केला होता, की ज्यातील किचन म्यानमारमध्ये तर बेडरूम इंडीयात होते. हा फोटो सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला होता. आणि त्याला खूपच लाईक्स मिळाले होते. आताही नागालॅंडचे मंत्री तेमजेन यांनी एका सुंदर रिसॉर्टचा फोटो त्यांच्या ट्वीटर खात्यावर पोस्ट केले आहेत. आणि इंटरनेट युजर्सना पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकले आहे. काय आहे त्यांची पोस्ट पाहूया.
आपल्या राज्याचा प्रत्येकालाच अभिमान असतो. नागालॅंडचे मंत्री तेमजेन यांना तर त्यांच्या राज्यातील समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा काकणभर जास्तच अभिमान आहे. परंतू यंदा त्यांनी नागालँडच्या ऐवजी सेव्हन सिस्टर पैकी एक असलेल्या अरूणाचल प्रदेशातील एका रिसॉर्टचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो ट्वीटर खात्यावर पोस्ट करीत म्हटले आहे की हे कश्मीर नाही की स्विर्त्झंलँड, स्विर्त्झंलँड फिक पडावं असं निसर्गरम्य आहे हे अरूणाचल प्रदेश असे म्हटले आहे.
ये हसीं वादियां…!?
This ain’t Switzerland nor Kashmir!
This is the newly completed Chighu Resort at Anini, Arunachal Pradesh. Such a wonderful site! Isn’t it?@PemaKhanduBJP Ji when are you inviting me ?
To visit, contact: https://t.co/dg7PdIAkrn#AmazingNortheast pic.twitter.com/CKbGAtzrXo
— Temjen Imna Along (@AlongImna) January 28, 2023
नागालँडचे मंत्री तेमजेन इमना यांनी सोशल मीडियावर अरुणाचल प्रदेशमधील नव्याने बांधलेल्या रिसॉर्टची छायाचित्रे समाजमाध्यमावर शेअर केली आहेत. आणि ट्विट केले की, ‘हे स्वित्झर्लंड किंवा काश्मीर नाही ! हे अरुणाचल प्रदेशातील अनिनी येथे बांधलेले चिघू रिसॉर्ट आहे. किती सुंदर साइट आहे ना ! असे म्हणत त्यांनी अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनाही टॅग केले आहे आणि विचारले, ‘तुम्ही मला कधी आमंत्रित करत आहात?’