Shopkeeper Customer Conversation : सोशल मीडिया (Social Media) आणि त्यावर व्हायरल (Viral) होणारे व्हिडिओ आपलं मनोरंजन (Entertain) करत असतात. लहान मुलांचे, प्राण्यांचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. ते आपल्याला खळखळून हसवतात. म्हणजेच काय तर हसणाऱ्या व्हिडिओंना यूझर्सकडून चांगलीच पसंती मिळते. आपण अनेकवेळा एकमेकांची खिल्ली उडवलेले व्हिडिओ पाहत असतो. एक स्वत:ला जास्त हुशार समजतो तर दुसरा त्याचा बाप निघतो. हे व्हिडिओ पाहिले तर जातातच शिवाय शेअरही केले जातात. याच प्रकारातला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दुकानदार आणि ग्राहक यांच्यातला संवाद यात दाखवलाय. अनेकवेळा दुकानदार ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, असं आपण ऐकलेलं आहे. यातही असंच काहीसं आहे. ग्राहकाला टोपी लावण्याचा दुकानदाराचा प्रयत्न होता. पण ग्राहकही त्याचा बाप निघाला. काय होतंय पाहू या…
दुकानदाराचा प्रयत्न फसला
कपड्याच्या दुकानात एक ग्राहक जीन्स पॅन्ट घेण्यासाठी जातो. ती पाहत असताना एक जीन्स ग्राहकाला आवडते. तो ती खरेदी करण्यासाठी दुकानदाराला सांगतो. त्याचवेळी त्याची किंमत विचारतो. पण किंमत ऐकून ग्राहकाला धक्काच बसतो. दुकानदार त्या पॅन्टची किंमत दहा हजार सांगतो. तुमच्या शेजारचा दुकानदार तर 500 रुपयांना विकतो पण तुम्ही तर एकदम दहा हजारांवर गेलात. त्यावेळी दुकानदार म्हणतो, की ही पॅन्ट अमिताभ बच्चन यांनी वापरली होती, म्हणून याची किंमत जास्त आहे.
ग्राहकही हुशार
दुकानदाराच्या या टोपी लावण्याच्या प्रकारावर ग्राहकही हुशार निघतो. तो खिशातून 500 रुपयांची नोट काढतो आणि दुकानदाराच्या हातावर ठेवतो. दुकानदार म्हणतो, की पॅन्ट तर 10 हजार रुपयांची आहे. त्यावर ग्राहक म्हणतो, की नोट मला नरेंद्र मोदींनी दिलीय. त्यामुळे त्याची किंमत किती होते माहितीये?
यूट्यूबवर अपलोड
हा व्हिडिओ यूट्यूबवर ग्रॅण्डमस्ती अर्पीत (grandmasti arpit) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. यूझर्सनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडलाय. 27 जानेवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 1,921,011+ व्ह्यूज मिळाले आहेत. यावर यूझर्सनी कमेंट्स करून आपल्याला व्हिडिओ आवडत असल्याचं दर्शवलंय. (Video Courtesy – grandmasti arpit)