नवी दिल्ली : हवाई प्रवास म्हटला की आपल्याला नाही म्हटले तरी थोडी तयारी करावीच लागते. जे नेहमीच विमानाने प्रवास करतात त्यांना विमान प्रवासाचा जास्त अनुभव असल्याने विशेष काही फरक पडत नाही. परंतू कधी तरी अनेक वर्षांनी विमान प्रवास करणाऱ्यांच्या मनात थोडी धाकधुक असते. विमानामुळे अनेक दिवसांचा प्रवास आता काही तासांवर आला आहे. त्यामुळे हवाई प्रवासाला हल्ली महत्व आले आहे. पण तुम्हाला माहीती आहे का जगातला सर्वात कमी वेळेचा हवाई प्रवास कुठे केला जातो. जगात अशी जागा आहे जेथे अवघ्या काही मिनिटांसाठी विमान प्रवास करावा लागतो.
अवघ्या काही सेंकदात संपतो प्रवास
जगातला सर्वात छोटा विमान प्रवास स्कॉटलंडमध्ये केला जातो. ही हवाई यात्रा स्कॉटलंडच्या दोन टापू दरम्यान केली जाते. वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे या दोन टापू दरम्यान हा विमानप्रवास केला जातो. तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्यचकीत वाटेल की जगातला सर्वात छोटी फ्लाईट केवळ 2.7 किमी अंतरासाठी चालवण्यात येते. एवढ्या छोट्या अंतरासाठी लोकांना विमानप्रवासाचा आधार घ्यावा लागतो. हा संपूर्ण विमान प्रवास टेक ऑफ ते लॅंडींगपर्यंत केवळ 80 सेंकदाच पूर्ण होतो म्हटले तर वावगं ठरणार नाही. म्हणजे संपूर्ण विमान प्रवास केवळ दीड मिनिटांत संपतो.
सबसीडी द्यावी लागते
या दोन प्रदेशादरम्यान कोणताही पूल किंवा रस्ता नसल्याने लोकांना हवाई मार्ग हाच एकमेव पर्याय उरल्याने येथे विमान सेवा चालविण्यात येत असते. एवढ्या छोट्या अंतरासाठी विमानसेवा चालवावी लागत असल्याने खरे तर विमान कंपन्यांना हे परवड नाही. परंतू तेथील सरकार लोकांना अन्य पर्यायच नसल्याने विमानप्रवासासाठी जनतेला सबसिडी देत असते.
छोट्या विमानांचा होतो वापर
या दोन टापूमध्ये प्रवास अत्यंत छोट्या वेळेचा असल्याने येथे छोट्या विमानांचा वापर केला जात असतो. या विमानात केवळ आठ प्रवासी बसू शकतात. ही आठ आसनी विमानेच येथे वापरतात येतात. हा विमान प्रवास लोगान एअर कंपनी मार्फत केला जात असतो. लोगान एअर कंपनी गेल्या 50 वर्षांपासून ही सेवा देत आहे.