VIDEO : सायकलपटू तरुणीचा अजब स्टंट; व्हिडिओतील कसरती पाहून हैराण व्हाल

| Updated on: Oct 31, 2022 | 11:13 PM

काही जण सायकलवर स्टंट करून अनेकांची मने जिंकतात. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या तरुणीच्या व्हिडिओमध्ये देखील लोकांना थक्क करणारा स्टंट पाहायला मिळत आहे.

VIDEO : सायकलपटू तरुणीचा अजब स्टंट; व्हिडिओतील कसरती पाहून हैराण व्हाल
सायकलपटू तरुणीचा अजब स्टंट
Image Credit source: social
Follow us on

आपल्या देशात टॅलेंटला काही कमी नाही. सोशल मीडियामुळे तर टॅलेंटला चांगली चालना मिळाली आहे. अगदी लहान मुलांपासून तरुण, वयोवृद्धांपर्यंत सगळेच आपल्या कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करत आहेत. याच दरम्यान अनेक थरारक कसरती दाखवणारे ही हौशी कलाकार कमी नाहीत. काही जण सायकलवर स्टंट करून अनेकांची मने जिंकतात. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या तरुणीच्या व्हिडिओमध्ये देखील लोकांना थक्क करणारा स्टंट पाहायला मिळत आहे.

व्हिडिओतील तरुणी दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे. विशेष म्हणजे डोक्यावर एक घागर ठेवून तिचा तोल सांभाळण्याचीही किमया तिने दाखवली आहे. त्यामुळे सोशल मीडियातील युजर्स तिच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स देऊन कौतुक करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सायकल चालवत दिलखेचक डान्स!

सर्वसाधारणपणे दोन्ही हात सोडून सायकल चालवण्याची किमया करणारे अनेक आहेत. पण हात सोडून सायकल चालवणे, डोक्यावर घागर सांभाळणे, इतकेच नव्हे तर सायकलवर बसून दिलखेचक डान्स करणे अशा तीन प्रकारच्या कसरती करत तरुणीने सर्वांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

तरुणीचे स्टंट्स पाहून अनेकांचा थरकाप उडतो आहे, तर अनेकांच्या तोंडून ‘बापरे’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाहेर पडत आहे. सोशल मीडियातील व्हिडिओवर अशा उत्स्फूर्त कमेंट्स नोंदवणाऱ्या युजर्सचे प्रमाण क्षणागणिक वाढतेच आहे. अनेकांनी तर तरुणीचे स्टंट्स स्वतः करून पाहण्याची जिद्द दाखवली आहे.

क्लासिकल डान्स करणे ही साधी गोष्ट नसते. सर्वसामान्यपणे अशा प्रकारचा डान्स करणे देखील आव्हान मानले जाते. व्हिडिओमध्ये तर तरुणीने धावत्या सायकलवर हा क्लासिकल डान्स करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

व्हिडिओने केली हजारो लोकांची करमणूक

तरुणीच्या स्टंट्सने सर्वांनाच थक्क केले आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ काही क्षणांतच हजारो लोकांची करमणूक करण्यात यशस्वी झाला आहे. अवघ्या 21 सेकंदांमध्ये हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचला.

अनेक जण तरुणीला दाद देत आहेत, त्याचवेळी अशा प्रकारचा स्टंट करताना जरा जपूनच, असा सल्ला देणाऱ्यांचीही सोशल मीडियामध्ये कमी नाही. पुरेसा सराव केल्याशिवाय कोणीही अशा प्रकारचा स्टंट मुख्य रस्त्यावर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.