मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज नवे-नवे व्हिडीओ (new Video)येत आहेत, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला शिक्षिका (Woman Teacher) विद्यार्थ्याचा गळा दाबत आहे. त्याचबरोबर त्याला बेदम मारहाण करीत आहे. या घटनेचा व्हिडीओ तिथल्या संबंधित एका इसमाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर महिला शिक्षिकेला शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील पौड़ी जिल्ह्यातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड राज्यातील पौडी जिल्ह्यात गुरुराम राय इंटर कॉलेजमध्ये एनएसएसचं शिबीर लागलं आहे. तिथं शिक्षिका विद्यार्थ्याला मारहाण करीत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून शिक्षिकेवरती जोरदार टीका होत आहे.
जेवून झाल्यानंतर भांडी न धुतल्यामुळे मारहाण केल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. भांडी न धुतल्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा गळा दाबला असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा सगळा प्रकार शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे शिक्षिकेवरती कारवाई होण्याची शक्यता आहे.