मुंबई : वाहनांचे अपघात ही बाब भारतामध्ये आता सामान्य झाली आहे. अधिकतर अपघात (Accident) हे चुकीच्या पद्धतीने वाहने चालवल्यानेच होतात. असाच भीषण अपघात झाला असून त्याची सोशल मिडियावर (Social Media) जोरात चर्चा सुरु आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मर्सिडीज आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली आहे. ज्यामध्ये ट्रॅक्टरचे तर दोन तुकडे झाले म्हणल्यावर मर्सिडिजची (Mercedes) काय अवस्था याची उत्सुकता लागली असेल. आहो पण आश्चर्यच कारचे किरकोळ नुकसान वगळता दुसरे काहीच झाले नाही. सुदैवाने या अपघातामध्ये मनुष्यहानी झाली नाही.
अपघातामध्ये साधारणत: मोठ्या वाहनामुळे लहान वाहनाचे नुकसानच पाहवयास मिळते. पण सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले पण आश्चर्यांची बाब म्हणजे मर्सिडिजचे एवढे नुकसानच झाले नाही. या कारच्या पुढच्या बाजूचा भाग थोडा डॅमेज झाला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आंध्रप्रदेशातील तिरुपतीजवळ चंद्रगिरी बायपास रोडवरचा असल्याचे समजत आहे. ट्रॅक्टर हा चुकीच्या बाजूने मार्गस्थ होत असल्याने हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाची चूक असून नुकसानही त्याचेच अधिकचे झाले आहे.
वाहन चालकाच्या एका चुकीमुळे काय होऊ शकते हे या व्हिडिओवरुन समोर आले आहे. अशाप्रकारे अपघात हे भारतामध्ये सर्रास होत असले तरी यातून कोणी धडा घेत नाही. या घटनेत मात्र, कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
आश्चर्यांची बाब म्हणजे मर्सिडिज गाडीच्या डाव्या बाजूला नुकसान झाले आहे तर ट्रॅक्टरचे मात्र दोन तुकडेच. या अपघातामध्ये असे घडले असले तरी काही दिवसांपूर्वीच अशाच मर्सिडिजमधून प्रवास करीत असलेले प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले होते.