Thieves Funny Video : सोशल मीडियाचं जग मजेदार व्हिडिओंनी भरलंय. कधी काय व्हायरल होईल, हे कोणी सांगू शकत नाही. सध्या तीन चोरां(Thieves)चा एक मजेशीर (Funny) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते काय चोरतात आणि कोणत्या पद्धती घेऊन जातात, हे पाहून तुम्हाला हसू येईल. हा व्हिडिओ अल्पावधीतच हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येनं नेटिझन्सनी त्याला लाइकही केलं आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात तीन चोरटे एका कारमध्ये बसून चोरी करण्यासाठी बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात त्यांची नजर घराच्या अंगणात लावलेल्या एलईडी (LED TV) स्क्रीनवर पडते. या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही आता पाहणार आहात, ते खूपच मनोरंजक आणि हसू येणारं आहे.
तिघांनाही अपयश
चोरट्यानं कारमधून उतरून अंगणात लावलेला एलईडी स्क्रीन काढण्यास सुरुवात केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. खूप प्रयत्न करूनही यश मिळालं नाही, तेव्हा दुसरा साथीदार त्याच्या मदतीला धावला. मात्र तिथं पोहोचण्यापूर्वीच तो जाऊन भिंतीला धडकला. मग तो कसा तरी आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आणि दोघेही भिंतीवरून एलईडी काढण्यात यशस्वी झाले, परंतु त्यानंतर आणखी एक मजेदार दृश्य व्हिडिओमध्ये दिसतं. हे दोन चोर एलईडी घेऊन बाहेर जाऊ लागताच ते जमिनीवर आदळते आणि त्याचवेळी टीव्हीस्क्रीन तुटतो.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर
सर्वात मजेदार क्षण येतो जेव्हा तिसरा चोर कारच्या मागील सीटचा दरवाजा उघडतो, परंतु इतर दोन चोर टीव्ही बाहेर काढण्यात अयशस्वी होताच, तो मागची सीट बंद करतो आणि त्याच्या साथीदारांसह पुन्हा कारमध्ये बसतो. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याला यश मिळालं नसलं तरी त्यांची फजिती मात्र झाली. पहिला चोर टीव्ही काढत असताना त्याचा एक पाय टीव्हीवर पडला, त्यामुळे टीव्हीच्या खालच्या भागाची स्क्रीनही खराब झाली. काही सेकंदांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ MEMES.BKS नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
आणखी बातम्या