Animal Video | वाघ रस्त्याच्या बाजूला पाणी पितोय, गाड्या लोकांनी लांब थांबवल्या आहेत, हा व्हिडीओ शेअर करीत अधिकाऱ्याने एक मजेशीर गोष्ट शेअर केली आहे.

| Updated on: May 02, 2023 | 8:50 AM

Animal Video | वाघ रस्त्याच्या बाजूला पाणी पितोय, गाड्या लोकांनी लांब थांबवल्या आहेत, हा व्हिडीओ शेअर करीत अधिकाऱ्याने एक मजेशीर गोष्ट शेअर केली आहे.

Animal Video | वाघ रस्त्याच्या बाजूला पाणी पितोय, गाड्या लोकांनी लांब थांबवल्या आहेत, हा व्हिडीओ शेअर करीत अधिकाऱ्याने एक मजेशीर गोष्ट शेअर केली आहे.
The tiger was drinking water sitting on the roadside
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : आपल्या एखादा प्राणी पाहण्यासाठी जंगलात जावं लागतं. परंतु जंगलात पर्यटनासाठी गेल्यानंतर सुध्दा काहीवेळेला वाघ दिसेल असं सांगता येत नाही. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ काढायला अधिक आवडतात. मागच्या आठवड्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फोटो काढत असल्याचे पाहिल्यानंतर वाघाने पर्यटकांवर हल्ला केला. सध्या भारतीय वन सेवामधील अधिकारी (Indian Forest Service) (IFS) परवीन कस्वां (Parveen Kaswan) यांनी कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य (Katarniaghat Wildlife Sanctuary) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातून जाण्याच्या राष्ट्रीय राजमार्गावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिथं रस्त्याच्या कडेला एक वाघ पाणी पीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जंगलात तुम्ही वाघाला पाणी पीत असल्याचं पाहिलं असेल. परंतु रस्त्याच्या कडेला एक वाघ पाणी पीत असल्याचं पाहिल्यानंतर दोन्ही बाजूचं लोकांनी गाड्या लावल्या आहेत. जंगलाच्या राजाचा कुणी सुध्दा अपमान केलेला नाही.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे “रोड स्टॉपर!! कटर्नियाघाट WLS पासून.”

हा व्हिडीओ खरा IFS अधिकारी आकाश दीप बधावन (IFS officer Akash Deep Badhawan) यांनी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी लिहीलं आहे की, जंगलातील बफर क्षेत्र परिसरातील रेंज अधिकारी कतर्नियाघाट यांनी हा व्हिडीओ घेतला आहे. त्या परिसरात कायम प्राणी पाहायला मिळतात.

हा व्हिडीओ 54 हजार लोकांनी पाहिला आहे. काही ट्विटर युजर्स यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना सुध्दा धक्का बसला आहे. एका युजरने कमेंट केली की, “पट्टेदार वाघाचा आदर केला पाहिजे. लोक ओरडत नाहीत किंवा हॉर्न वाजवत नाहीत हे पाहून बरे वाटले.”


आणखी एका नेटकऱ्याने सुचना केली आहे की, “कदाचित त्यांना आमच्या परिसरापासून दूर त्यांच्या वस्तीत पाण्याचे खड्डे हवे असतील.”

तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “गेल्या डिसेंबरमध्ये कटर्नियाघाट WLS ला भेट दिली. ते छान होते. वाघासोबत नशीब नाही पण बरेच दुर्मिळ पक्षी पाहिले. बिबट्याच्या झोपडीत अप्रतिम मुक्काम केला.” चौथ्या नेटकऱ्याने टिप्पणी केली, “किती सुंदर दृश्य आहे.”