नवी दिल्ली : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच सोशल मीडियातील सक्रिय असतात. नेहमीच महिंद्रा आपल्या फॅन्ससाठी काही ना काही कंटेट सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर (Video Share on Social Media) केला आहे. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ महिंद्रा ट्रॅक्टरचा (Mahindra Tractor Video) आहे. ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रा यांनी बक्षिसही जाहीर केले आहे.
व्हिडिओमध्ये काही व्यक्ती महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरवर बसलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा ट्रॅक्टर महिंद्राचाच आहे, पण हा कोणत्या देशात आहे? हे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल, असेही महिंद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियातील खूप प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना मदतही करतात. आज त्यांनी महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत जनतेला एका सवाल केला आहे. याचे योग्य उत्तर देणाऱ्याला मिनी ट्रॅक्टर बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे.
These are Mahindra Tractors of course, but which country is this? I’ll send the first person with the right answer a scale model tractor shown in the accompanying pic. pic.twitter.com/TkA1Y5AlwD
— anand mahindra (@anandmahindra) October 12, 2022
व्हिडिओमध्ये काही परदेशी नागरिक महिंद्रा अँड महिंद्राच्या ट्रॅक्टर चालवताना दिसत आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 14.5 हजारहून अधिक लाईक्स, 4 लाख 34 हजारहून अधिक व्ह्यूज आणि कमेंट्स पण आल्या आहेत.
एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, हा व्हिडिओ जर्मनीतील वाटत आहे. तर दुसऱ्या एका युजरने हा कॅनडातील व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? कोण योग्य उत्तर देते आणि कोणाला मिळणार मिनी ट्रॅक्टर याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.