लहानग्यांसाठी आले अनोखे जीवरक्षक टीशर्ट, आनंद महिंद्र यांनीही केली प्रशंसा

| Updated on: May 26, 2023 | 1:51 PM

उद्योजक आनंद महिंद्र यांनी सोशल मिडीयावर एका अनोख्या टी-शर्टचा व्हिडीओ शेअर केला असून तो खूपच व्हायरल होत आहे. काय आहे त्या टी-शर्टची वैशिष्ट्ये पाहूयात

लहानग्यांसाठी आले अनोखे जीवरक्षक टीशर्ट, आनंद महिंद्र यांनीही केली प्रशंसा
float (1)
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्र हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. ते सोशलमिडीयावर चांगल्या पोस्ट शेअर करीत असतात. त्यांच्या पोस्ट खूपच इंटरेस्टींग आणि महत्वाची माहीती देणाऱ्या असतात. अलिकडेच उद्योगपती आनंद महिंद्र यांनी खास लहान मुलांच्यासाठी डीझाईन केलेल्या टीशर्टचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्र यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक महत्वाचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती लहान मुलासाठी हे टी शर्ट कसे काम करते ते सांगताना दिसत आहे. आनंद महिंद्र यांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे की याला नोबेल पुरस्कार कदाचित मिळणार नाही. परंतू हे माझ्या त्या शोधांपासूनही खुप मोठे आहे. कारण दोन लहान नातवांचा आजोबा म्हणून त्यांचे भले आणि सुरक्षितता माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे.

या पोस्टला आतापर्यंत सात लाखांहून अधिक वेळा पाहीले गेले आहे. आणि प्रतिक्रिया देखील भरपूर आल्या आहेत. या अनोख्या टीशर्टला फ्लोटी नावाच्या एक फ्रान्सच्या कंपनीने विकसित केले आहे. या नविन टीशर्ट बद्दल माहीती देताना म्हटले आहे की आपण लहान मुलांना पाण्यात पोहताना हाथाला लाईफगार्डच्या पट्ट्या लावून सोडतो. परंतू पाण्याबाहेर आल्यावर ते दिसायला विचित्र दिसतात. तसेच डोके पाण्यात गेल्यावर हे लाईफ गार्ड फारसे उपयुक्त नसतात. या नव्या टीशर्टमुळे यात हवा शिरल्यानंतर आपले डोके वरच्या दिशेला सुरक्षित राहिल्याने श्वास घेता येतो.

हा पाहा व्हिडीओ…

 

ज्यावेळी लहान मुले पाण्यात उतरू इच्छीत नाहीत तेव्हाच सर्वात जास्त पाण्यात बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. किंवा अचानक पाण्यात पडल्याने अपघात होत असतात. अशावेळी आपण केवळ पट्टीच्या पोहणाऱ्या प्रशिक्षकावरच विश्वास ठेवू शकतो. परंतू हे टीशर्ट एरव्ही ते परीधान केल्यावर ते लाईफ जॅकेट आहे याचा पत्ताच लागत नाही अशी त्याची डीझाईन आहे. या अनोख्या टी शर्टची किंमत 149 युरो ( सुमारे 13000 रु.) आहे. या टी शर्टमुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. अनेक लोकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. या अनोख्या टीशर्टच्या शोधामुळे पालकांना खूपच समाधान वाटत आहे